सामाजिक

वस्ताद लहुजी साळवे जयंती कार्यक्रम यवतमाळ येथे संपन्

Spread the love

अरविंद वानखडे
यवतमाळ( वार्ता )
काल दुपारी बारा वाजता, सेंटर सेलिब्रेशनहॉल बचत भवन येथे, लहुजी साळवे निवृत्त कर्मचारी बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या वतीने लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून, वीणा तेलंगे यांनी स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, साहेबरावजी खडसे, उद्घाटक म्हणून माणिकरावजी खडसे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून एस पी कांबळे सर नांदेड, प्राध्यापक शेखर कासार सर, तसेच लोणावळा नगरपरिषद येथील अधिकारी श्री विनोद रावजी बोरकर उपस्थित होते. वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना समाजामधील, लढवय्या वृत्ती बाबत व शैक्षणिक क्षेत्रामध्ये, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे लहुजी साळवे कशाप्रकारे होते यावर प्रकाश टाकला. कासार सर यांनी समाजा प्रति शिक्षणाचे महत्त्व, व पालकत्व यावर भर दिला. तसेच विनोद रावजी बोरकर यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रति समाजाच्या भावना, समाजामध्ये बाबासाहेबांचं असलेलं महत्त्व सांगितलं.
कार्यक्रमाकरिता अनेक मान्यवर दारवा, घाटंजी नेर, व इतर ठिकाणावरून गर्दी जमली होती.
कार्यक्रमाचे संचालन श्री अंकेश्वर हिवराळे सर यांनी अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक प्राध्यापक बाळकृष्ण सरकटे सर यांनी केले. तर आभार श्री ज्ञानेश्वर रावजी खंडारे यांनी केले. संस्थेच्या वतीने भोजन दाते श्री. नंदकुमार वानखडे, राजू वानखडे, इंगोले सर, दळवी सर व इतर मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता श्री. गवळी साहेब, बावणे साहेब व उबाळे साहेब व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close