हटके
म्हणूनच म्हणतात ‘ कानुन के हाथ बहोत लंबे होते हैं ‘
मुंबई / नवप्रहार मीडिया
घटनास्थळी मृत व्यक्तीचे हात आणि पाय कापून ठेवलेली सूटकेस आढळली होती. तसंच मृतदेहाच्या शरीरातून रक्तस्राव होऊ नये यासाठी शर्ट गुंडाळला होता. याशिवाय अन्य कोणताही पुरावा नव्हता. पोलिसांनी अत्यंत हुशारीने प्रकरण हाताळून आरोपींना गजाआड केलं. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी नेमका कसा केला ते जाणून घेऊया.
क्राईम वर्गात मोडणाऱ्या काही घटना अश्या असतात ज्यात पोलिसांना घटनास्थळावरून काहीच पुरावा मिळत नाही. पण पोलीस विभागाने जर ठरवले की या गुन्ह्याचा छडा लावायचा तर मग पोलीस वाले काहीही करून पुरावे गोळा करतात आणि मग आरोपीच्या मुसक्या आवळतात. असाच काहीसा प्रकार मुंबई मध्ये आढळलेल्या ऐका मृतदेहाच्या बाबतीत घडली आहे. घटनास्थळी मृत व्यक्तीचे हात आणि पाय कापून ठेवलेली सूटकेस आढळली होती. तसंच मृतदेहाच्या शरीरातून रक्तस्राव होऊ नये यासाठी शर्ट गुंडाळला होता. याशिवाय अन्य कोणताही पुरावा नव्हता. पोलिसांनी अत्यंत हुशारीने प्रकरण हाताळून आरोपींना गजाआड केलं.
मुंबईतल्या माहीम समुद्रकिनारी एक सूटकेस पाण्यावर तरंगताना काही जणांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन ही सूटकेस उघडली. त्यात एका पुरुषाचा मृतदेह होता; पण मृतदेह म्हणजे फक्त कापलेले हात आणि पाय होते. घटनास्थळी धड किंवा शीर नव्हतं. हा मृतदेह कोणाचा आहे,तो पाण्यात कोणी फेकला असे अनेक प्रश्न पोलिसांना प्रथमदर्शनी पडले. हातापायांवरून हा मृतदेह पुरुषाचा आहे एवढंच पोलीस ओळखू शकले. त्यानंतर पोलिसांनी एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे का हे पाहण्यासाठी परिसरातल्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला; पण तसं काही नव्हतं. सूटकेसमध्ये काही कपडे सापडले. त्यात एक शर्ट आणि स्वेटर होता. पोलिसांसाठी हा एकमेव पुरावा होता; पण हा मृतदेह कुणाचा, त्याची हत्या कोणी केली हे प्रश्न अनुत्तरित होते. पोलिसांना सापडलेल्या शर्टावर एक टॅग होता. त्यावर टेलरचं नाव लिहिलेलं होतं. पोलीस पथकाने त्या दुकानाचा पत्ता शोधला. हे दुकान कुर्ल्यात होतं. आता पोलीस आरोपीच्या जवळ पोहोचणार होते; पण मृतदेह कुणाचा हे मात्र समजत नव्हतं. या घटनेची पूर्ण कहाणी पोलिसांनी तपास करून जगासमोर आणली,
26 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री बेनेटचा त्याच्या राहत्या घरी खून झाला. त्याची मुलगी रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने काठीने बेनेटच्या डोक्यावर घाव घालून त्याला जखमी केलं. त्यानंतर त्याच्या तोंडात झुरळ मारण्याचं औषध ओतलं. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे घरातल्या बाथरूममध्ये तुकडे केले. रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने यासाठी बाजारातून धारदार चाकू आणला होता. कित्येक तास बेनेटचा मृतदेह घरात होता आणि हे दोघं त्याचे तुकडे करत होते. या दोघांनी बेनेटच्या मृतदेहाची तीन भागांत विभागणी केली. शरीराचे दोन भाग वेगवेगळ्या पॉलिथीन पिशवीत भरले, तर हात आणि पाय सूटकेसमध्ये भरले. काळी पॉलिथीन बॅग मुंबईतल्या मिठी नदीत फेकून दिली तर सूटकेस समुद्रात फेकली. बेनेटच्या शरीरातून तीव्र रक्तस्राव होत होता. रक्त बाहेर पडू नये यासाठी या दोघांनी शर्ट, स्वेटर आणि काही कपड्यांनी हातपाय बांधले; पण हेच कपडे हा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आणि खुनाचं रहस्य उलगडलं.
पोलिसांनी तपास करताना शर्ट शिवलेल्या टेलरचं दुकान गाठलं. टेलरने बिल बुक तपासून हा शर्ट बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीसाठी शिवला असल्याचं सांगितलं; मात्र टेलरकडे त्याचा फोन नंबर नव्हता. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये या व्यक्तीची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला; पण एवढ्या मोठ्या शहरात हे काम मुश्किल होतं. त्यानंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडं गेलं. बेनेटचा शोध घेण्यासाठी फेसबुकची मदत घेतली गेली. अनेक प्रोफाइल्स पाहिल्यानंतर पोलिसांना पुरावा म्हणून हाती असलेला स्वेटर घातलेली व्यक्ती एका प्रोफाइलमध्ये दिसली. या प्रोफाइलवरून बेनेट ही व्यक्ती म्युझिक टीचर असून, ती गिटार शिकवते हे समजलं. फेसबुकच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला.