महिलेने या कारणाने केला पोलिसाचा पाठलाग : लाजिरवाणा पोलीस पळाला
पोलीस झाला निरूत्तरीत , जाब न देताच पळाला
मुंबई / नवप्रहार मीडिया
सहसा मुंबई चे लोक आपल्या कामा सोबत काम ठेवतात.त्यांना इतरत्र तोंड खुपसन्याची सवड नसते. कारण त्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. पण काल रस्त्यावर जे घडले ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण कार चालवत असलेली ऐक महिला दुचाकीवर असलेल्या पोलिसाचा पिछा करताना दिसली. लोकांना सुरवातीला आश्चर्य वाटले पण जेव्हा त्यांना यामागील कारण समजले तेव्हा त्यांनी त्या महिलेचे कौतुक केले.
नियम संगळ्यांसाठी सारखे आहेत असे म्हटल्या जाते. मग तो सामान्य माणूस असो की देशाचा राष्ट्रपती. पण काही शासकीय कर्मचारी मात्र कायदा आपल्या खिशात आहे असे वागतात. आता पोलीस विभागाचे च घ्या ना ! काही पोलीस दुसऱ्यांना तर नियम सांगतात. पण स्वतः मात्र ते पाळत नाहीत. असाच प्रकार मुंबई शहरात घडला आहे. येथे ऐक पोलीस कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी चालवत होता. त्याला विना हेल्मेट दुचाकी चालवताना पाहून कार चालविणारी महिला त्याचा पिछा करते. आणि त्याला आपका हेल्मेट कहा है ? असा प्रश्न करते. कार मध्ये बसलेल्या अन्य व्यक्तीने हा व्हिडिओ शुट केला आहे.
महिलेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ एकाने नेटकऱ्याने शेअर केला असून २८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये महिला हेल्मेट नसल्याबद्दल अधिकाऱ्याला हॉर्न वाजवत हेल्मेट का घातले नाही याचा जाब विचारतांना दिसत आहे. या मुळे संबंधित पोलिस देखील चक्रावला असून महिलेला उत्तर न देता पोलिस निघून जातांना दिसत आहे.
८ नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओला आता पर्यंत ५ हजाराहून अधिक लाईक्स आणि असंख्य कमेन्ट नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी देखील पाहिला आहे. नेटकऱ्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
तर काही नेटकऱ्यांनी या महिलेवर देखील निशाना साधला आहे. पोलिस कर्मचाऱ्याचा पाठलाग करताना महिलेने स्वत: सीटबेल्ट लावला नव्हता. एका व्यक्तीने सीटबेल्ट न घातल्याने आणि वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “या महिले विरुद्ध गुन्हा दाखल करा तसेच सीट बेल्ट न घातल्याबद्दल आणि रहदारीला अडथळा आणल्याबद्दल तिच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करा असे नेटकऱ्याने म्हटले आहे.
एकाने तर या महिलेची चांगलीच खरडपट्टी काढली आहे त्याने हिन्दी मध्ये लिहिती, “अरे दीदी पहले खुद तो सीट बेल्ट पाहनो. ढोंग की भी सीमा होती है! असे म्हटले आहे
शिवाय, काहींनी चिंता व्यक्तकरत अधिकाऱ्याने दुचाकी चालवताना हेल्मेट नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली. तर काही नेटकऱ्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक देखील केले.