तळेगाव दशासर पोलिसांच्या त्या कामगिरीने 13 लोकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
2,80,000 आहे मोबाईल ची किंमत
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
मोबाईल हा वर्तमान काळात जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. मोबाईल कुठे चुकीने विसरलो तरी काही तरी चुकल्यासारखे वाटते. आणि मोबाईल हरवला की मग तो सापडनारच नाही अशी मोबाईल धारकाची मानसिकता होऊन बसते. पण जी वस्तू आता पुन्हा मिळणार नाही अशी मानसिकता बनवलेल्या व्यक्तीला जर तो मोबाईल परत मिळाला तर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो एखादी न मिळणारी वस्तू मिळल्यागत असतो. असाच प्रकार तालुक्यातील तळेगाव दशासर येथील ठाण्यात पाहायला मिळाला आहे. येथील रहिवाशांचे चोरीला गेलेले मोबाईल मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहे.
सायबर क्राईम विभागाची मदत घेत केली कामगिरी – ठाणेदार रामेश्वर धोंगडे यांनी मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर त्या तक्रारीला केराची टोपली न दाखवता सदर क्या मोबाईल बद्दल सायबर क्राईम विभागाची मदत घेत ते राज्याच्या वेगवेगळ्या भागातून हस्तगत केले.
नागरिकांनी मानले पोलीस विभागाचे आभार – पोलिसांनी राज्यातील अनेक विभागातून हस्तगत केलेले मोबाईल पोलीस उपविभागीय अधिकारी सचींद्र शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल धारकांसह नागरिकांनी पोलीस विभागाच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
पोलिसांची मदत करणाऱ्या ग्राम सुरक्षा समितीचा केला सत्कार – तसेच पोस्टे तळेगाव येथे मागील महिन्यात बकऱ्या चोरीचे एकूण 12 गुन्हे उघड करून त्यातील चोरीस गेलेल्या बकऱ्या हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्यात आल्या होत्या त्यासाठी पोलीसांना मदत करणारे ग्राम धनोडी गावचे ग्रामसुरक्षा दल मधील एकूण 15 सदस्यांना त्यांनी आरोपी पकडून देण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिंदे यांच्या हस्ते प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.
सदरची कामगिरी ही *मा.पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ सो,अप्पर पो अधीक्षक श्री शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचींद्र शिंदे, स्थागुशा चे पो नि श्री किरण वानखेडे,सायबरचे पोनि. श्री अजय अहिरकर* यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. तळेगांव (द.) येथील
Api रामेश्वर धोंडगे Psi कपिल मिश्रा , Hc गजेंद्र ठाकरे ,LHC कांचन दहाटे Pc संदेश चव्हाण व सायबर पोस्टे चे Hc अजित राठोड
यांनी केली आहे.