अन् क्षणात उदयास आले नवीन बेट
लोकसमुद्रात ज्वालामुखी चां उद्रेक ; तयार झाले नवीन बेट
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ पैकी काही व्हिडिओज असे असतात त्यावर सहसा विश्वास बसत नाही. त्यात असे काही पाहायला मिळते की हे आप उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत यावर आपला विश्वासाचं बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा असून क्षणात त्याठिकाणी नवीन बेट निर्माण झाले आहे. ही घटना जपानच्या समुद्रात घडली.
जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस 1000 किमी अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेक एवढा भीषण होता की, त्यातून काही मिनिटांत नवीन बेट तयार झाले. या बेटाचा आकार किमान 200 मीटर लांब आहे. हे बेट इवोटो बेटाच्या किनाऱ्यापासून थोडे दूर आहे. पूर्व इवोटोला इवोजिमा म्हणतात. 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे या बेटाची निर्मिती झाली.
इवोटोवर सध्या जपानी नौदलाचा एअरबेस आहे. याचा दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. बेटावरील नौसैनिकांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला मोठा आवाज ऐकू आला, यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बेट तयार झाल्याचे पाहिले. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, 21 ऑक्टोबरपासून इवातो बेटाच्या आसपास सौम्य भूकंपही येत आहेत. पण पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होईल, असे वाटले नव्हते.
जपानमध्ये अनेक ज्वालामुखी बेटे
यापूर्वीही जपानच्या आजूबाजूला काही बेटे निर्माण झाली होती, पण खराब हवामानामुळे ती गायब झाली. आता जिथे नवीन बेट तयार झाले आहे, तिथे 1986 मध्ये असेच बेट तयार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत येथे एकही बेट तयार झाले नव्हते. आता हे बेट किती दिवस टिकणार, हे येणाऱ्या काळात कळेल.
जपानच्या आसपास 7000 नवीन बेटे
या वर्षाच्या सुरुवातीलाच जपानच्या आजूबाजूच्या भागांचा अभ्यास करून नकाशा तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये 7000 नवीन बेटांचा शोध लागला. अशा प्रकारचे सर्वेक्षण 35 वर्षात प्रथमच करण्यात आले. मात्र, या नवीन बेटाच्या निर्मितीमुळे जपानच्या सीमांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.