मराठा आरक्षणासाठी मुर्तीजापुरात निघाला मोर्चा
मराठ्यांचा एल्गार
मूर्तिजापूर /अनिल डाहेलकर
आज मुर्तीजापुर शहरात सकल मराठा समाजाने मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुर्तीजापुर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी तीन दिवसाच्या साखळी उपोषणानंतर आज मुर्तीजापुर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा मध्ये महिलांचा सहभाग होता दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणा देत मोर्चा एस.डी.ओ. कार्यालयावर धडकला.. आरक्षणाच्या मागण्याचे निवेदन महिला प्रतिनिधींच्या हस्ते देण्यात आले उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री बनसोड साहेब यांनी निवेदन स्वीकारले *निवेदनामध्ये मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात यावा, सरसकट समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजबांधव आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत नोकर भरती करू नये आणि शासनाने दिलेला दोन महिन्याच्या कालावधीमध्येच आरक्षणाचा निर्णय घ्यावा* इत्यादी मागण्यांचा समावेश निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांसह तालुक्यातील मराठा संघटना, सामाजिक संघटना राजकीय पक्ष प्रतिनिधी, मराठा सेवा संघ मराठा, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी निवडक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले यामध्ये आकाश जाधव चिकणे, पप्पू पाटील तिडके, विवेक शिंदे, सौ शितल भेलोंडे यांचा समावेश होता.
यावेळी मराठा आरक्षणाला विविध मान्यवरांनी आप आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये तिरळे कुणबी पाटील संघटनाचे अनिल गावंडे, शिवसेना शहरप्रमुख विनायक गुल्हाने, सह्याद्री मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेयर सोसायटी चे तालुका समन्वयक मिलिंद इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश कुकडे, श्री सिंधी सेवा समितीचे भारत जेठवाणी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ जोगडे, बजरंग दल चे ता.अध्यक्ष आनंद बांगड , नेहरु युवा मंडळ , मुर्तिजापूर चे अध्यक्ष अनिल डाहेलकर आदींचा समावेश होता.
मोर्चामध्ये श्याम वळस्कर मराठा सेवा संघ ता. अध्यक्ष गजानन बोर्डे पाटील अक्षय देशमुख, राम कोरडे गजानन चौधरी, गजानन देशमुख शरद हजबे , संभाजी ब्रिगेड चे विभागीय कार्याध्यक्ष संजीव गुप्ता, उज्वल ठाकरे सौरभ काटकर, यश काटकर, गणेश चव्हाण, के.जी. शिंदे, मुन्ना नाईकनवरे, सदाशिवराव शेळके प्रदीप फुके, डॉक्टर रवींद्र लांडे, गुलाबराव म्हसाये , चेतन पवार प्रतीक गांजरे, ऋषी शेंडगे, बंटी जाधव, आकाश भोसले, ऋषी सावंत, सनी नाईकनवरे, सोनू मोहिते, विजयराव भोसले, र
ज्ञानेश्वर लोंढे, नवीन जाधव, राजविर आकाश जाधव, दुर्गाबाई मोहिते, मंगला लिंगाडे, सविता चव्हाण, जया सारते, वैभवी चव्हाण, निळकंठराव देशमुख हिरल पिंपरे, दिलीप पिंपरे, दत्ता बरडे ,सुनिता जावरकर, प्रमिला साखरे, शोभा राऊत, शीला उंबरकर, तुळसाबाई सोनवणे द्वारकाबाई जाधव, नीता जाधव, वनिता पाथरे, रजनी भिंगारे लक्ष्मी वळस्कर, वैजू अवताडे पल्लवी जाधव, अविनाश बांबल विनोद देवके, केतन देशमुख, दत्ता बोर्डे, पंकज देशमुख, प्रा. सुधाकर गौरखेडे, बाळू ठोकळ, राम हिंगणकार, निखिल गावंडे, गोपाळ देशमुख, भागवत सेवाकर, विजय तिडके, शेख इम्रान शेख खलील, सुधाकर चव्हाण, रामचंद्रजी माने,प्रा. प्रमोद ठाकरे यांचेसह इतर नागरिकांचा मोठा सहभाग होता.