सामाजिक

अखेर आसरा गावातील पाणीप्रश्नाचा तिढा सुटला

Spread the love

 

नितीनजी कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न अखेर निकाली लागला

प्रतिनीधी/अमरावती :

*सतत निरन्तर सूरू असलेल्या दुष्काळामुळे आधीच ग्रामीण भागातील बांधव त्रस्त झाला असुन त्यामधे पाणीटंचाई समस्या त्यांच्या दुःखात आणखीनच भर पाडते.यासाठी शासकिय उपाययोजना फक्त कागदावरच शोभेची वस्तू म्हणुन वावरत होत्या.यावर कुठल्याही प्रकारची अमलबजावणी शासनाकडून दिसून येत नव्हती.*
*दरम्यान भातकुली तालुक्यातील आसरा गावामधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईमुळे मोठा ञास सहन करावा लागत होता.त्यामुळे मोठी पायपीट येथील महीलाना करावी लागत असल्याने तेथील वस्तुस्थितीचा आढावा घेतं समाजसेवी नितीनजी कदम यांनी आसरा गावी गेल्या काहीं दिवसापूर्वी भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. वेळोवेळी येथील लोकप्रतिनिधींना येथिल परिस्थिती सांगितली असताना सुद्धा जाणीवपूर्वक ते पाणीटंचाई संदर्भातला प्रश्न मार्गी लावत नाहीत. म्हणुन सम्पूर्ण नागरिकांच्या व्यथा जाणून घेत समाजसेवी नितीनजी कदम यांनी ‘पाणी पुरवठा विभाग , आसरा’ येथे भेट देत उप अभियंता विभागाचे अधिकारी व सर्वत्र गांवकरी मंडळी भेट घेत सर्व सत्यपरिस्थितीची जाणीव करून देत त्यांना पाणीटंचाई संदर्भात निवेदन देण्यात आले होते.*
*दरम्यान यावर अजूनही कायमस्वरूपी उपययोजना न आखल्यामुळे नितीनजी यांनी आसरा गावातील नागरिकांसोबत थेट पाणीपुरवठा विभाग कार्यालय गाठत ठिय्या ठोकला. सतत पाणीप्रश्न गंभीर स्वरूपाचे वळण घेत असताना गावकऱ्यांचा सिमेचा बांध फुटला. व संपूर्ण परिस्थीती लक्षात घेऊन नितीनजी यांनी सकाळच्या पहाटे थेट आसरा गावात पोहोचत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना विश्वासात घेत कार्यालयाकडे आपला मोर्चा घेऊन आपल्या सततच्या पाठपुराव्यासंबंधी अधिकाऱ्यांना प्रश्न करत पेचात पाडले. अशातच हाताबाहेर जात असलेली परिस्थीती बघता मजीप्राच्या (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) अधिकाऱ्यांनी विलंब न करतां व परिस्थितीला अनुसरून संबधीत प्रश्नासंबंधी हालचालींना वेग देतं अखेर आसरा गावातील पुरवल्या जाणाऱ्या पाणीप्रवाहाचा वेग वाढवला व कायमस्वरूपी या पाणीप्रश्नाचा तिढा अखेर कायमचा सोडवला.* *दरम्यान समस्त गावकऱ्यांनी समाजसेवी नितीनजी कदम यांचे आभार मानत व लोकप्रतिनिधींविषयी आपला रोष व्यक्त केला. यावेळी संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी सोबतच आसरा गावकरी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*

 

********

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close