ऑनलाइन शॉपिंग मुळे व्यापारी हैराण, बाजारपेठेत ग्राहकच नाही! दिवाळीसाठी लागणाऱ्या दिव्यांचे दुकाने सजली,व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत

.
नेर:- नवनाथ दरोई
पोळा,गणपती, दुर्गा उत्सव, दसरा हे उत्सव संपलेत. आता दिवाळीचे धामधूम सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने कपड्याने, किराण्यांनी सजून ठेवलीत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही बाजारपेठेत पाहिजे तशी ग्राहकाची गर्दी दिसून येत नाही. मग हे ग्राहक गेले कुठे? तर मोबाईल वरून ऑनलाईन खरेदीचा फॅन मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने.दिवाळी सारख्या सणाला बाजारपेठा सामसून दिसून येत आहे. दिवाळीत आपापल्या मुलांसाठी कपडे, किराणा खरेदीसाठी बाजारपेठा गजबजून जायच्या, परंतु आता युवा पिढी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देताना दिसून येते.कपडे किराणा, घरगुती उपयोगाच्या वस्तू, दिवाळीचा आकाश दिवा, दिवनाला यासारख्या लहान मोठ्या वस्तू नामांकित कंपन्या मार्फत ऑनलाइन बोलाविणे ग्राहक अधिक पसंत करत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेले दिवनाला,भुलाई, प्रसाद विकणाऱे व्यवसाईक सध्यातरी हात गुंडाळून बसलेले दिसून येते. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे असे म्हणणे आहे की, बाजारातील वस्तू ऑनलाइनच्या किमतीपेक्षा जास्त भावाने मिळत असल्यामुळे ऑनलाइन खरेदी कडे ग्राहकाचा अधिक कल वाढलेला दिसून येते. ऑनलाइन बोलाविलेल्या वस्तू खराब निघाल्यास कंपनी ती वस्तू परत घेऊन त्याबद्दल दुसरी वस्तू देत असल्यामुळे ग्राहकाचा ऑनलाईन वरील विश्वास अधिकच वाढला आहे. ग्राहकांनी आपल्या दुकानाकडे ओढ लागावी यासाठी खरेदीवर सूट देण्यात येत आहे. बाजारपेठेत स्किम द्वारे ग्राहकाला व्यापारी प्रलोबन देत असल्याचेही दिसून येते.