महारुद्र नगरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष
चांदूर रेल्वे / अमोल ठाकरे
नगर परिषद हद्दीतील महारुद्र नगरमध्ये जंगली झाडे,काटेरी झुडुपे व अस्वच्छता वाढल्यामुळे आज स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून नगरातील परिसराची स्वच्छता अभियान राबवून नगरातील वाढलेली जंगली झाडे,काटेरी वृक्ष,गाजर गवत नाल्यांमधील कचरा काढुन स्वच्छता केली.या परिसरातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गेल्या दहा वर्षांमध्ये महारुद्र नगर मध्ये प्रार्थमिक सुविधा रोड,नाल्या,नळ योजना, मुलांना खेळाचे मैदान दिले नाही अश्या अनेक समस्या परिसरातील नागरिकांना भासत असून प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले म्हणून महारुद्र नगरातील नागरिकांनी कंटाळून स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या वर्गणी गोळा करून स्वच्छता मोहीम हाती घेत परीसर स्वच्छ केली यावेळी राजू देवके,संजय ठाकूर,महाजन सर,बिट्टू मेश्राम,आकाश मोटघरे,गोपाळ गणेशकर,महेश यावले, सुरेंद्र मस्केसह नगरातील असंख्य नागरीक उपस्थित होते.