क्राइम

प्रियकराला प्रेयसी सोबत ठेवायचे होते सबंध पण तिने नकार देताच

Spread the love

घरातच खड्डा करून पूर्लाई होता मृतदेह

लखनऊ / नवप्रहार मीडिया 

                   ती पती पासून घटस्फोट घेऊन आपल्या दोन मुलांसह आईकडे राहत होती. तिचे तरुणासोबत सुत जुळले. त्यांच्यात शारीरिक सबंध सुरू झाले. करवाचौथ क्या दिवशी ती त्याला भेटायला गेली.तो नशेत टल्ली होता. त्याने तिला सबंधासाठी म्हटले तिने नकार दिला. त्याने तिला रागाच्या भरात धक्का दिला. तिचे डोके बाजूच्या टेबलावर आपटल्याने डोक्यातून जबरदस्त रक्तस्त्राव होऊ लागला. काही कळायच्या आत तिने प्राण सोडला. त्याला शुद्ध आल्यावर आपण हे काय करून बसलो ? हे त्याच्या लक्षात आले. आपणाला पोलीस पकडतील या धाकेने त्याने घरातच खड्डा खोदून तिचा मृतदेह त्यात पुरला. पण काही दिवसानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने ठाण्यात जाऊन पोलिसांना आपबिती सांगितली. आणि ही मर्डर मिस्ट्री उलगडली.

लखनऊ येथे 2020 साली ही घटना घडली होती. रुबी नावाच्या तरुणीचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. ती तिच्या आई आणि दोन मुलांसह राहत होती. करवाचौथच्या रात्री तिने तिच्या आईला सांगितले की ती तांत्रिकाला भेटायला जात आहे. संपूर्ण रात्र उलटून गेली तरी रुबी घरी परतली नाही म्हणून त्यांनी तांत्रिकाला फोन करुन चौकशी केली मात्र त्याने ती इथे आलीच नसल्याचे सांगितले. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही रुबीचा काहिच पत्ता नसल्याने तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठले.

पोलिसांनी रुबीचे कॉल डिटेल तपासले तेव्हा कळले की रुबीचा एक प्रियकर आहे. मात्र, त्यानेही रुबीबद्दल काहीच सांगण्यास नकार दिला. रुबी जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याचा काहीच पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र, अचानक एके दिवशी रुबीचा प्रियकर पोलिस ठाण्यात आला. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला रुबीची आत्मा दिसते ती मला जगून देणार नाही, असं तो वारंवार सांगत होता. त्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. करवाचौथच्या रात्रीच रुबीची हत्या करण्यात आली व त्याच खोलीत तीन फुट खड्डा खणून तिचा मृतदेह दफन करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीच्या खोलीत खोदकाम करताच तिथे एका मुलीचा सांगाडा सापडला. मुलीच्या हातात असलेल्या बांगड्यावरुन तिच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली. आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यानेच हत्येचा कबुलीजबाब दिला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close