महाप्रबोधन यात्रेसाठी ऊसळला जनसागर, प्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे कडाडल्या,महिला मोठ्या संख्येने उपस्थित.

नेर:-नवनाथ दरोई
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर महा प्रबोधन यात्रेचा झंजावात नुकताच संपताच, नेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावरुन महा प्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे निवडणूक निशाणी मशाल पेटवून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रजोलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, पोहरादेवी येथील महत सुनील महाराज,माझी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख,संतोष ढवळे,बाबू पाटील जैत, सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर राठोड हे पाहुणे मंचावर उपस्थित होते शिवसेनेचा अपंग कार्यकर्ता गणेश ठाकरे यांचा सन्मान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी भगवा शेला खादयावर टाकून स्वागत केले. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनीही अधारे यांना पुष्प माला अर्पण करुन स्वागत केले. क्रीडा संकुलवर प्रबोधन ऐैकन्यासाठी तालुक्यातून असंख्य शिवसैनिक जमा झाल्याने क्रीडा संकुलवर जनतेचा महासागर दिसून येत होता. या महासागराला सुषमा अंधारे मार्गदर्शन करतानां अश्या म्हणतात की, भाजपा सरकार हे सुडाचे राजकारण करत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महागाईने गोरगरीब जनता त्रस्त आहे.अशातच मोदी सरकार फसव्या जाहिरातीतून जनतेच्या जख्मेवर मीठ चोळत आहे.खा.भावना गवळी यांच्यावर बालाजी फर्टीकल घोटाळ्या वरुन भ्रष्टाचाराचा आरोप भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी केला.मग आता त्याच भावना गवळीनी मोदिला राखी बाधली आणि त्यांच्या वरील आरोप संपूस्टात आले .असे एक नाही तर अनेक उदा देऊन जनतेचे प्रबोधन केले.