कहालकर दवाखाना” तर्फे तीर्थक्षेत्र आळंदी येथे मोफत “वैद्यकीय आरोग्य व सेवा शिबीर”
भंडारा ( प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकी” ह्या दृष्टीकोनातून “सबका भला करो” ह्या उदारभावनेने “कहालकर दवाखाना” मार्फत “गोरगरीब, अनाथ, रूग्ण तसेच गरजूंना मदत केली जाते. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारा दवाखाना म्हणून त्यांची ओळख आहे. दि. 25 ऑक्टोबर 2023 ला “कहालकर दवाखाना” तर्फे संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदीर तीर्थक्षेत्र आळंदी (देवाची आळंदी) येथे मोफत “वैद्यकीय आरोग्य व सेवा शिबीर” आयोजित करून गोरगरीब व वारकरी बंधू-भगिनींची सेवा करण्यात आली.
“कहालकर दवाखाना” मार्फत गेल्या दोन वर्षांपासून “आषाढी एकादशी वारीनिमित्त” वारकरी संप्रदाय बंधू-भगिनींची वारीमध्ये चालून चालून पाय दुखणे, शरीर दुखणे ह्यासाठी मसाज करून देणे, आरोग्य तपासणी करणे तसेच अन्नदान करणे हे पुण्याचे काम केले जाते. त्यामुळे वारकरी बंधूं-भगिनी साक्षात माऊली प्रमाणे आशीर्वाद देवून जातात.
“कहालकर दवाखाना” चे मार्गदर्शक श्री. ईस्तारीजी कहालकर हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील टेकेपार/माडगी, पो. गुंथारा ह्या एका छोट्याशा खेडेगावातील असून “खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा” ह्या न्यायाने व “गोरगरीबांची सेवा, भुकेलेल्याला अन्नदान” हीच खरी ईश्वर सेवा आहे हे मानून ते मार्गदर्शन करत असतात. तसेच पुण्यातील “कहालकर दवाखाना” हा आपल्या भंडारा जिल्ह्यातील “गोरगरीब रूग्णांची सेवा करावी म्हणून व पुण्यासारखीच ट्रीटमेंट कमी दरात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील रूग्णांना मिळावी व त्यांचे दुःख जावून, जिल्ह्यातील लोक आनंदी व निरोगी राहावेत ह्या उद्देशाने दिवाळीनंतर प्रत्येक महिन्याचे “दहा दिवस” कहालकर दवाखाना आता भंडारा येथे असणार आहे.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त “02 नोव्हेंबर ला “मातोश्री वृद्धाश्रम पुणे” येथे अनाथ आईवडिलांची “मोफत आरोग्य तपासणी व फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ.अक्षय ईस्तारीजी कहालकर, डॉ.प्रियंका अ. कहालकर, डॉ.अमृता पाटील, डॉ.गणेश सर, डॉ. बिषण रावत आदींनी खूप मेहनत घेतली असून ते सदैव तत्पर असतात.
…मनोगत….
वारकरी मायमाऊलींच्या व रूग्णांच्या चेहर्यावरचा आनंद हीच आपली श्रीमंती आहे, सबका भला करो यही आवाज करेंगे कारण आम्ही “खाली हाथ आलोय, खाली हाथ जाणार आहोत त्यामुळे आमच्या डोळ्यांना सगळेच लोक सुखी व आनंदी दिसोत हीच देवाकडे मागणे आहे.
-डॉ.अक्षय कहालकर, एम.डी. (कआयरओ),निसर्गोपचार तज्ज्ञ