धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांच्या मागण्या मंजूर करा
भंडारा जिल्हा धान खरेदी संघाची मागणी
जिल्हाधिकाऱ्याना निवेदन
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील धान खरेदीचे आदेश देण्यात आलेल्या संस्थांना धान खरेदी करण्या करिता जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत हया अटी खरेदी संस्थांना परवडण्यासारखी नसुन हया अटी तात्काळ प्रभावाने रदद करून भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांच्या मागण्या पुर्ण करण्यात याव्यात यामागणी चे निवेदन भंडारा जिल्हा धान खरेदी संघाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात
जिल्हाधिकारी यांनी धान खरेदी संस्थांची व पणन अधीकारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली संयुक्त सभा घ्यावी,तसेच खरेदी केंद्राकरिता रू. 20 लक्ष अनामत रक्कम रोखीने भरणा करण्याबाबद अट शासनाने घातली आहे ती रद्द करण्यात यावी. व “ब’ वर्ग संस्थेस किमान रक्कम रू. 1 कोटी बँक गॅरेंटी ची रक्कम भरणा करण्याची अट रदद करावी, धानाची घट 0.50 टक्के असुन 3 टक्के करणे व खरेदी सुरू होताच धानाची उचल करावी संस्थांना खरेदी कमिशन प्रति क्विंटल रू. 60 करावे , गोदाम भाडे जेव्हा पर्यंत गोदामामध्ये धान साठवुन ठेवण्यात येते तेव्हा पर्यंतचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाडे प्रमाणपत्रा नुसार किंवा तांदुळ ठेवण्यात येतात व त्या गोदामाचे भाडे मिळतात त्या प्रमाणे गोदाम भाडे गोदाम मालकांना द्यावे आदी मागण्या चे निवेदन उपजिल्हाधिकारी लिना फडके यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचे सचिव ठाकचंद मुंगूसमारेसह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.