इस्त्रायल चा गाझा च्या अल अन्सार मशिदीवर हल्ला

इस्त्रायल आमी हमास युद्धाची भीषणता दिवसागणिक वाढत आहे. दोन्ही देशांचे परस्परांवर हवाई हल्ले सुरू आहेत. या युद्धात आता पर्यंत 4500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायल ने वेस्ट बँकमधील जेनिन येथील अल अन्सार मशिदीवर हवाई हल्ला केला. याठिकाणी हमास चे कमांड सेंटर असल्याचा दावा इस्त्रायल ने केला आहे.
हमसाने या मशिदीला कमांड सेंटर बनवले होते असा दावा इस्राइली लष्कराने दावा आहे, येथूनच ते हल्ल्याची योजना आखत होते आणि इस्राइलींना ठार मारत होते. हमाससोबतच हिजबुल्लाह देखील इस्राइलविरोधात युद्धात सहभागी झाले आहेत. इस्राइलवर लेबनॉनकडून हल्ले केले जात आहेत. गेल्या 14 दिवसांत आपले 14 सदस्य मारले गेल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे.
मशिदीवरील हवाई हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टिनी प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्राइलने केला आहे. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्राइलने पश्चिम किनाऱ्यावर केलेला हा दुसरा हवाई हल्ला आहे. जेनिन निर्वासित छावणीजवळ असलेल्या अल अन्सार मशिदीला इस्रायलने लक्ष्य केले आहे. पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटना हमासने हा तळ बनवला होता आणि येथूनच हल्ल्याची योजना आखण्यात आली होती, असे इस्राइलचे म्हणणे आहे.
इस्राइलच्या लष्कराने या हल्ल्यानंतरचे फोटोही प्रसिद्ध केले असून मशिदीत मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे गोळा करण्यात आल्याचा दावा केला आहे. याशिवाय मशिदीत बंकरही बांधण्यात आले होते असा दावा देखील करण्यात आला आहे. इस्राइलने याआधीही या भागात हवाई हल्ले केले आहेत. या भागात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी राहतात.
हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटोनुसार, या हल्ल्यात मशिदीचा मोठा भाग कोसळला आहे. त्याभोवती एक रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसून येत आहे. लोक ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ देखील समोर आळे आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्राइलने गाझावर हल्ले करणे सुरु केले. इस्राइलच्या हल्ल्यात 3400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टिनी प्रशासनाने केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींनी गाझामधील लोकांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. इजिप्तमार्गे गाझामध्ये 20 ट्रक पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या भीषण युद्धात गाझामध्ये 40 टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत
.