शासकीय दवाखान्यासह खाजगी दवाखान्यातही झाली गर्दी
शासकीय दवाखान्यासह खाजगी दवाखान्यातही झाली गर्दी
मूर्तिजापूर – ( वि. प्र. अनिल डाहेलकर ) दिवसा उन आणि रात्रीचं काही प्रमाणात थंडी अश्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजाराच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन बदललेल्या वातावरणाचा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये अचानक गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
वातावरणात झालेल्या बदलामुळे ” व्हायरल इन्फेक्शन ” असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दिवसा उन आणि रात्री थंडीमुळे सर्दी, तापासह अगंदुखी यासारख्या आजारांमुळे शहरी तथा ग्रामीण भागात घरोघरी रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात गारठा सुद्धा आहे. अधून मधून कडक उन्हामुळे गरमी होत आहे. हवामानातील या लागली आहे. त्यामुळे काळजी सततच्या बदलामुळे लहान मुलांसह नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर कडून करण्यात येत आहे. मोठ्यांचे आरोग्य बिघडू लागले एकीकडे दुपारच्या वेळी ३७ अंश सेल्सिअस तापमान राहते आणि पहाटे थंडी जाणवते. त्यामुळे सध्या व्हायरल इन्फेक्शन ,ताप, टायफाईड,डेंग्यू रूग्ण आढळत आहेत. अशा वेळी प्रकृतीची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टर करीत आहेत.सध्या डासांचे प्रमाण वाढले असल्याने डेंग्यू रूग्ण आढळत आहेत. अशा वेळी डासांचा बंदोबस्त करावा तसेच डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावी. जेणेकरून प्रकृतीवर परिणाम होणार नाही. आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
त्यामुळे उत्तम स्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते.व्हायरल इन्फेक्शनचे रूग्ण अधिक : सध्या व्हायरल इन्फेक्शन आणि डेंग्यूचे रूग्ण आढळत आहेत. तसेच सर्दी, खोकल्याचा त्रास दिसून येतो. उन्हातून घरी आल्यावर पाणी भरपूर प्यावे, थंड पदार्थ सेवन करू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये, धुळ धुळीच्या कणापासून दुर राहावे पुरेशी झोप घ्यावी तसेच दैनंदिनी व्यवस्थित ठेवावी.
——————————————————–
अशी आहेत लक्षण ( विष्णाणूजन्य )
१) अंग् कणकण करणे
२) डोके दुखी
३) सर्दी, ताप, खोकला
४) तोंडाची चव जाणे
५) आळसपणा येणे
६) थकवा जाणवणे
७) भुक मंदावणे
८) थंडी वाजणे
———————————————————-
अशी घ्यावी काळजी
१) वेळेवर नास्ता, जेवन करणे
२) भरपूर पाणी प्यावे
३) व्यायाम करणे
४) झोप पुर्ण घ्यावी
५) मोबाईल व टि व्ही जास्त वेळ पाहणे टाळावे
६) घराची व परिसराची स्वच्छता राखावी
७) बाहेर जाताना मास्कचा वापर करावा
८) डॉक्टरांच्या सल्लेशिवाय कुठलाही औषधोपचार घेऊ नये
———————————————————
ऋतू बदलत असताना विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारांसाठी येत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात नागरिकांनी योग्य काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजारांची तीव्रता वाढू शकते.
डॉ. आशिष चक्रनारायण
एम डी मेडिसीन
लाईफ केअर हॉस्पीटल,मूर्तिजापूर