अपघात
केशव नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

-
मारेगाव ( वार्ता )
अरविंद वानखडे
केशव नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या लक्षमन रामचंद्र शिदोरकर ( 42 ) यांनी 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान करणवाडी येथील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची समजते. लक्ष्मण शिदोरकर हे केशव नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक पदी कार्यरत होते त्यांची अचानक आर्णी येथे लिपिक या पदावर बदली केली, त्यांची अचानकडिंमोशन झाल्यामुळे त्यांची मनस्थिती खालावली होती. त्यांच्या वडिलांची तब्येत अत्यंत हलाखीची असून, त्यांनी संस्था चालकांना विनंती करून आपल्याला वनी येथेच कार्यरत ठेवावे अशी वारंवार विनंती केली परंतु त्यांच्या विनंतीला कुठल्याही प्रकारचा सन्मान मिळाला नाही.
ह्या प्रकरणी पतसंस्थेकडून लक्ष्मण शिदोरकर यांना वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात आल्याचे विश्वासनीय सूत्राकडून समजते. त्यांच्या पत्नीने मारेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, सहसचिव अनिल अक्केवार, व कार्यकारी अधिकारी दीपक दोन कुंडवार राहणार वनी, यांच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत कलम 306, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1