रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
भंडारा / प्रतिनिधी
देश प्रेमी रामसिंधू रामसिंधू सेवा संस्था डोंगरगाव/साक्षर, जनता टाइम्स फाऊंडेशन, लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तूप तसेच युवा सार्वजनिक सार्वजनिक दुर्गा मंडळ मुरमाडी/तूप यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिर दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोज मंगळवारला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रसंगी सुषमा प्रकाशजी चुटे सरपंच ग्रामपंचायत मुरमाडी/तूप यांनी तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशभाऊ रामकृष्ण शिवणकर देशप्रेमी रामसिंधू सेवा संस्था डोंगरगाव/साक्षर यांनी रक्तदानाने शारीरिक आरोग्य व सामाजिक बांधिलकी निर्माण होते असे म्हटले. प्रमुख पाहुणे स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथील प्राचार्य प्रा.डॉ. विश्वास खोब्रागडे यांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले. शिबिरा दरम्यान प्रा.बी.बी ढवळे प्रा.विशाल गजभिये, प्रा.डॉ. अर्चना निखाडे, प्रा.महिंद्रकुमा़र फुलझेले, मेघनाथ मेश्राम उपसरपंच मुरमाडी/तूप ताराचंद निरगुडे माजी उपसरपंच, डॉ. मोटघरे, जनता टाईम्स फाउंडेशनचे अखिलेश कांबळे, अर्चना लोखंडे, महाराष्ट्र झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य उमाजी बिसेन, युवा सार्वजनिक दुर्गा मंडळाचे रविभाऊ कोरे,तुषार कठाणे आशिष कटाणे,सागर निरगुडे इत्यादी उपस्थित होते.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामध्ये गावातील नागरिक स्व स्व निर्धन पाटील वाघ आहे कला व विज्ञान महाविद्यालय येथील प्राध्यापक यांचा समावेश होता. शिबिरासाठी समर्पण रक्तपेढी भंडारा यांची चमू प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे,शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,शोएब शेख, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.