हटके

शिक्षिकेचे जडले होते विद्यार्थ्यांवर प्रेम ; धर्मांतरासाठी टाकत होती दबाब 

Spread the love

                    शिक्षक मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आई वाडीलांपेक्षाही जास्त मेहनत घेत असतात. असे असतांना देखील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रेमप्रकरण ही काही नवीन बाब राहीलेली नाही. पण अश्या प्रकरणात पुरुष शिक्षकांचेच नाव समोर येत असते. परंतु या प्रकरणात मात्र महिला शिक्षिकेने हा प्रकार केला आहे. मुख्य म्हणजे तिचा नवरा आणि दिर हे त्याच शाळेत नोकरी करीत असल्याचे आणि त्या विद्यार्थ्यांवर धर्मांतरासाठी दबाब आणत असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वडिलांनी मुलाचा मोबाईल चेक केल्यावर त्यातील मॅसेज पाहून त्यांना सर्व प्रकार समजला. आणि त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

                     या शिक्षिकेचं दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रेम झालं. एवढंच नाही तर त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याच शाळेत त्या महिला शिक्षिकेचा पती आणि भाऊ देखील नोकरी करतात.

पीडित मुलाच्या वडिलांना एकदा त्याच्या मोबाईलमध्ये शिक्षिकेचे काही मेसेज दिसले. ते मेसेज पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मुलीला अश्लील मेसेज पाठवले होते. त्याशिवाय त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात येतं असल्याचंही त्या त्यांना समजलं. ही शिक्षिका रात्रभर मुलाशी फोनवर गप्पा मारत होती.

मोबाईलमधील हे संभाषण वाचून वडिलांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शिक्षिका आणि त्याचा पती, भावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे तिघेही त्यांच्या मुलावर धर्मांतर करण्यासाठी दाबव टाकत असल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

मुलगा आणि शिक्षिका यांच्यामधील चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स वडिलांनी पोलिसांना दिले आहे. पण त्यात धर्मांतर करण्यासाठीचा कुठलाही पुरावा वडिलांनी दिला नाही. त्यावर वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, मुलाने अनेक चॅट डिलीट केले आहेत.

दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या प्रकरणाचे तथ्य ते शोधून काढत आहेत. सबळ पुरावे मिळाल्यावर तिघांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी मुलाच्या वडिलांना दिलं आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close