शैक्षणिक

घाटंजी पंचायत समिती व पांढरकवडा तालुक्यातील मुख्याध्यापकांची आढावा सभा संपन्न.

Spread the love

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

आज दि.१३ ऑक्टो.२०२३ रोजी एस.पी.एम.गिलानी महाविद्यालय,घाटंजी येथे मा.शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री राऊत मॅडम ( जि.प.यवतमाळ) यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती घाटंजी व पांढरकवडा तालुक्यातील मुख्याध्यापकांची आढावा सभा घेण्यात संपन्न झाली.
या सभेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका श्रीमती आलिया शहजाद मॅडम,विस्तार अधिकारी अनिल शेंडगे सर आणि विस्तार अधिकारी सुधाकर वांढरे सर उपस्थित होते.या आढावा बैठकीमध्ये मा.शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री राऊत मॅडम यांनी युडायस प्लस २०२३-२४ ची संच मान्यता,बिंदू नामावली,शिक्षण समायोजन, विविध शाळा समित्या आणि शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. मा.शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष शाळा प्रशासनामध्ये येणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन केले.विस्तार अधिकारी श्री.अनिल शेंडगे सर यांनी प्रेझेंटेशन द्वारे मुख्याध्यापकांना बाल संरक्षण समिती,टास्क फोर्स, पोक्सो कायदा इ. विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सभेसाठी पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.या कार्यक्रमासाठी गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एम.ए.शहजाद सर यांचे सहकार्य लाभले. यावेळी गिलानी महाविद्यालयातर्फे मा.शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री राऊत मॅडम यांचा सत्कार श्रीमती आलिया शहजाद यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन शि.प्र.मं.माध्यमिक व उच्चतर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एफ.आय.पठाण सर तसेच कन्या शाळेचे मुनेश्वर मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन पर्यवेक्षक श्री.दीपक सपकाळ सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री.संजय ताजने सर,पर्यवेक्षक श्री.मनोज बुरांडे सर,इम्रान शेख सर, शि.प्र.मं. माध्यमिक व उच्चतर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close