सेलोटी येथे धर्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
लाखनी – संपूर्ण विश्वाला सत्य , करूणा व अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्ममार्गाचे अनुवर्तन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॉक्टोंबर १९५६ रोजी केले होते. या ऐतिहासिक धर्मांतराची स्मृती सदैव मनात असावी या हेतूने दरवर्षी बौद्ध बांधवांतर्फे धर्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केला जातो.
लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे ६७ व्या धर्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच महादान हा सूत्र मनात ठेवून प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानाचे महान कार्य करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आनंद बुद्धविहार सेलोटी च्या वतीने करण्यात आले आहे.
शिबीरात भाग घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी लाखनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मिलींद तायडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.