प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.
यवतमाळ, अरविंद वानखडे
राळेगाव तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ०८ उपकेंद्राचे निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये ३२कर्मचाऱ्यांची मागणी असून अनेक पदे रिक्त आहे.राळेगाव मुख्यालयात १३ कर्मचाऱ्यांची मागणी असून येते ०८ आरोग्य सेवक व सेविका पैकी ०५ आहे.वाढोना बाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र, या केंद्रांकडे शासनाचे व स्थानिक कार्यरत असणाऱ्या डॉकटर भरती केली नसून डॉ.खान हे गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी करारा वरती कार्यरत आहे. ए टि लॅब टेक्निशियन नसल्याने विविध समस्यांनी पिससी ग्रासले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तालुका सध्या सर्दी ताप खोकला अशा संस्था रोगाची मोठ्या प्रमाणात लागत सुरू असून मात्र येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने रुग्णांच्या आरोग्याची गैरसोय होत आहे.
सर्दी खोकल्यासाठी दररोज अनेक रुग्णांची संख्या वाढत असून यांच्या वरती उपचार करण्याकरिता एक परिचारिका व दोन महिला कर्मचारी हजर राहतात विशेष म्हणजे अधिकारी कर्मचारी येथे उपलब्ध नसल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यांच्या आरोग्याकडे शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र वाढोना बाजार व तालुक्यातील इतर पियसी बाजार प्राथमिक रुग्णालयात दिसून येत आहे.
वाढोणा बाजार येथील रुग्णांचे नातेवाईक प्रकाश पोपट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीचे उत्तर मिळाले त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे शासकीय यंत्रणा कडून व जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून येथे कर्मचारी संख्या वाढवावी. अन्यथा पेशंट दगावल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली नसून २० दिवसा पूर्वी डॉ.गोपाल पाटील तालुका अधिकारी यांची बदली झाली आहे. २०दिवसा पासून तालुका अधिकारी याचे पद रिकामे असून तालुक्यात जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक त्वरित करण्यात येण्याची मागणी जोर करीत आहे.
कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांची मागणी सुद्धा जोर धरत आहे.
तुटपुंज्या मनुष्यबळाच्या जोरावरच रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील उपकेंद्रांत रिक्त असणाऱ्या जागांमुळे रुग्णांना सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
अनेक केंद्राकडे दुर्लक्षितपणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची त्रुटी आहे.
त्यामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. येथील रेंगाळत पडलेल्या उप प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मार्गी लावण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील आठ उपकेंद्रांत आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, मदतनीस यांची पदे रिक्त आहेत. याकडे राजकीय पक्षांनी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.