शैक्षणिक

_अधिकाऱ्यांना धरले धारेवर कामात हयगय खपवुन घेणार नाही खा.नेते_

Spread the love

_खासदार अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली एटापल्ली उपविभागीय अधिकारी कार्यालय, सभागृहात तालुका अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न_

एटापल्ली:/ प्रतिनिधी

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे *मा. खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते* यांच्या अध्यक्षतेखाली एटापल्ली उपविभागीय कार्यालय येथील सभागृहात तालुक्यातील विविध विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी मा.खासदार महोदयांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध महत्वपूर्ण विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. या बैठकीच्या सुरवातीला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा परिचय घेत आढावा घेण्यात आले. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थित व अनुपस्थित नोंदणी करत
अनुउपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावे आशा सुचना यावेळी दिल्या. अधिकाऱ्यांची चांगली फिरकी घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरत विकास कामात हयगय खपवुन घेणार नाही. जे अधिकारी वर्ग कामचुकारपणा करतात त्यांची गय केली जाणार नाही,असे निर्देश अधिकाऱ्यांना खासदार अशोक नेते यांनी दिले.याप्रसंगी कृषी अधिकारी,आरोग्य अधिकारी, वनविभाग अधिकारी,(एम.एस.ई बी )विद्युत महावितरण अधिकारी,पोलीस विभाग,एस.टी महामंडळ (बस डेपो) महसुल विभाग, पाणी पुरवठा, सिंचाई,ग्रामसेवक असे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.

या बैठकीला प्रामुख्याने मा.उपविभागीय अधिकारी वाघमारे साहेब, तहसिलदार भांडेकर,प्रकल्प अधिकारी चव्हाण मॅडम,थानेदार कुकडे,(बिडीओ) विस्तार अधिकारी गांवहाने,एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष निखील गादेवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, जिल्हा सचिव बाबुराव गंफावार,विजय नल्लावार,अशोक पुल्लुरवार, प्रसाद पुल्लुरवार,प्रसाद दासरवार,संपत पैदाकुलवार, प्रशांत मंडल,मनोज मुजुमदार,
व इतर सर्व विभागाचे अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close