नेर येथील न्यायालयात इ- फायलिंग फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन

नेर :- नवनाथ दरोई
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे मार्फत दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी दिवाणी व फौजदारीन्यायालय नेर येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक सदस्य एडवोकेट आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवाणी न्यायाधीश श्रीमान व्ही एस.शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व निर्धार असोसिएशनची अध्यक्ष एडवोकेट रमेश जुनघरे यांच्या अध्यक्षतेखाली ई फाइलिंग फॅसिलिटी सेंटरचे दिप प्रजोलीत करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी कार्यकारणी सदस्य पदाधिकारी न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शासकीय कार्यालय संगणकीय दृष्ट्या अद्यावत होत असताना न्यायालयामध्ये दाखल होणारी प्रकरणी ही ऑनलाईन न्यायालयाच्या वेबवर रजिस्टर होणार असल्याने कागदपत्रे रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत आता कालबाह्य होत आहे. त्यामुळे सदर प्रणालीचा लाभ हा सर्वसामान्य पक्षकार वकील मंडळी यांनी घेऊन कागदमुक्त न्यायालयीन कामकाज व्हावे याकरिता सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ॲड.आशिष देशमुख, न्यायाधीश व्हि.एस. शिंदे तसेच नेर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.रमेश जूनगरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केले आहे.