क्राइम

कडेकोट पोलीस सुरक्षेतून नायजेरियन कैद्याचे पलायन

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया

            सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.।परंतु यापैकी काही व्हिडीओ अनेक वेळा बघितले जातात.आणि त्याची खूप चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर असच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक नायजेरियन तरुण कडेकोट पोलीस बंदोबस्तात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले आहे.

काही दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील फरार झाला होता. यानंतर आता ड्रग्ज प्रकरणातच एक नायजेरियन नागरिक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

झटपट न्यूज या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दिसतंय की काही पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चालले आहेत. पोलीस या व्यक्तीला व्हॅनमध्ये बसवत असतानाच हा अचानक पळून जातो.

याठिकाणी सुमारे दहा ते बारा पोलीस असताना तो सुसाट पळून जातो. काही पोलीस त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये एक पोलीस खाली पडतो, तर काही दुसऱ्या बाजूने जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो आरोपी पुढे पळून जातो.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, आणि पुढे त्या आरोपीचं काय झालं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.हा आरोपी नायजेरियन असून, नवी मुंबईमधून त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात येत होती; असं या व्हिडिओच्या डिस्क्रीप्शनमध्ये सांगितलं आहे. तसंच व्हिडिओमध्ये दिसतंय की या व्यक्तीला श्री अरिहंत प्लाझा नावाच्या इमारतीमधून बाहेर आणलं होतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close