स्कुल ऑफ स्कॉलर्स तर्फे धम्माल दांडिया कार्यशाळेचे आयोजन
नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स तर्फे नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून भव्य धम्माल दांडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा एस ओ एस कब्स, बुधवार बाजार रोड, धामणगाव रेल्वे येथे ६ ते १४ ऑक्टोबर २०२३ रोजी दररोज संध्याकाळी ४ ते ६ वाजता या कालावधीत होणार आहे. या कार्यशाळेला शहरातील सुप्रसिद्ध दांडिया प्रशिक्षिका लेखा चेतन कोठारी व मानसी ललित वसानी मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेत युनिक गरबा स्टाईल जसे की पारंपरिक, बॉलीवूड, दांडिया, डिस्को, गरबा व तालिया रास असे विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क ५०० रुपये इतके आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी ६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे व आपला आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन शाळेतर्फे प्राचार्या के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांनी केले आहे.