मोर्शी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न
शिवाजी शाळा सर्वसाधारण विजेता तर इतर शाळांना संमिश्र यश
मोर्शी
युवक व क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद अमरावती द्वारा आयोजित 14,17 व 19 वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या मोर्शी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच तालुका क्रीडा संकुल व शिवाजी माध्यमिक शाळेत यशस्वीरीत्या संपन्न झाल्यात.या क्रीडा स्पर्धेत कबड्डी,खो खो,व्हॉलीबॉल,क्रिकेट,फुटबॉल,बॅडमिंटन,कुस्ती,बुद्धिबळ,योगासन व मैदानी खेळ इत्यादी दहा खेळांचा समावेश करण्यात आला होता.क्रिकेट व फुटबॉल मध्ये 14 आणि 17 वर्ष वयोगटात स्थानिक शिवाजी शाळेने निर्विवाद वर्चस्व राखत विजय संपादित केला तर 19 वर्ष वयोगटात आर.आर.लाहोटी महाविद्यालयाच्या संघाने या दोन्ही खेळ प्रकारात विजय संपादित केला.14 वयोगटात मुलांच्या स्पर्धेत भारतीय विद्यालय राजूरवाडी,17 वयोगट मुलांच्या कबड्डीमध्ये शिवाजी शाळा,19 वयोगटात आर.आर.लाहोटी महाविद्यालय तर मुलींमध्ये 14 मध्ये गांधी विद्यालय काटपुर,17 मध्ये शिवाजी शाळा मोर्शी,19 मध्ये आर.आर.लाहोटी महाविद्यालय विजयी ठरले.व्हॉलीबॉल या खेळप्रकारात 14,17 वयोगट मुलांमध्ये शिवाजी शाळा मोर्शी,14 मध्ये झेनिथ इंग्लिश स्कूल मोर्शी,17 मुलींमध्ये शिवाजी शाळा तर19 व्हॉलीबॉल मुलांमध्ये आर.आर.लाहोटी व मुलींमध्ये भारतीय महाविद्यालय मोर्शी विजयी ठरले.खो खो 14 वयोगटात मुलांमध्ये मध्ये सातपुडा विद्यालय पाळा,मुलींमध्ये लोकमान्य विद्यालय पोरगव्हान विष्णोरा 17 मुला मुलींमध्ये पोरगव्हान विष्णोरा,19 वयोगट मुलांमध्ये अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय कोळविहिर तर मुलींमध्ये आर.आर.लाहोटी महाविद्यालय मोर्शी विजयी ठरले.बॅडमिंटन,बुद्धिबळ व योगासना मध्ये शिवाजी शाळेने वर्चस्व राखत विजय संपादित केला.मैदानी खेळ प्रकारात तालुक्यातील शाळांनी संमिश्र यश संपादित केले.तालुका स्तरीय या क्रीडा स्पर्धेत स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.