ब्रेकिंग न्यूज

10 हजाराची लाच घेताना विस्तार अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Spread the love
बीड  / नवप्रहार मिडिया 
                कारवाईतून सूट देण्यासाठी आणि वर्षभर सहयोग करण्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालका कडून 10 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विस्तार अधिकारी (कृषी ) याला रंगेहाथ अटक केली आहे.
ही कारवाई उस्मानाबाद एसीबीच्या टीमने केली.
जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती, पाटोदा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी आरोपी भुतपल्ले यांनी 6 सप्टेंबर 2023 रोजी पंचांसमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. बुधवारी (दि.4) 10 हजाराची लाच पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उस्मानाबादचे उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सापळा अधिकारी नानासाहेब कदम, अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांनी
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close