शैक्षणिक

गोंडवाना विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात

Spread the love

गडचिरोली, / तिलोत्तमा समर हाजरा.

स्थानिक लोकांचा एकल प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिली. यात १०० गावांतील तरुण-तरुणी सहयोगी म्हणून काम करू लागले. सरळ विद्यापीठ गावातील लोकांशी जोडले गेले.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ हे समाजातील लोकांना जोडणारे विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार यांनी केले. यावेळी त्यांचा पत्नी शुभदा देशमुख यांच्यासह सत्कार करण्यात आला.
२ ऑक्टोबर २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाने १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत १३व्या वर्षात पदार्पण केले.त्या निमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण , परीक्षा भवन व मॉडेल कॉलेज भवनाचे लोकार्पण तसेच विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. उद्घाटक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखा अधिकारी डॉ. भास्कर पठारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत मोहिते, डॉ. संजय गोरे, स्वप्नील दोंतूलवार, डॉ. प्राचार्य लेमराज लडके, डॉ. विवेक गोर्लवार, गुरुदास कामडी, प्रशांत दोंतुलवार, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. रंजना लाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी या विद्यापीठाला दिला आहे, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. जिल्हाधिकारी संजय मीणा म्हणाले की, विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखा सुरू करावी. विद्यापीठ विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, विद्यापीठाच्या निर्णयात व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधीसभा यांचा महत्वाचा वाटा आहे .विद्यापीठाच्या प्रगतीसाठी असलेल्या कुठल्याही निर्णयात आडकाठी येत नाही.नुकत्याच विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी या दोन कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या आहेत .त्यातून काही विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता आहे.गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची मागास ही ओळख मिटून जिल्ह्याबरोबरच विद्यापीठाचे नाव राष्ट्र स्तरावर जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.”मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी संजय मीणा यांना रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते अमृत कलश सुपूर्द करण्यात आला. प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, मनोगत रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे ,संचालन डॉ. शिल्पा आठवले, तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. या सोहळ्यात जीवन साधना गौरव पुरस्काराने आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संयोजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार संजय रामगीरवार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सहयोगी प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) (विद्यापीठ) भीमराव उराडे, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (वर्ग ३) (महाविद्यालय) प्रयोगशाळा सहायक प्रशांत रंदई, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (वर्ग ४) (महाविद्यालय) प्रयोगशाळा परिचर योगीता रायपुरे,उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार अभिजित अष्टकार, उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार डिंपल बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका जान्हवी पेद्दीवार , कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक आदींचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व मुख्य पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार होते. पण या दोन्ही मंत्र्यांची विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्याला अनुपस्थिती होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close