रासेयो स्वंयसेवकांनी झाडू हातात घेऊन शहरात सफाई करण्यात सुरुवात केली
अभियानाला चळवळीचे स्वरूप द्या – डॉ.बबन मेश्राम
गोंदिया – जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित एन.एम.डी महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमा
अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वंयसेवकांनी झाडू हातात घेऊन शहरात ठिकठिकाणी सफाई करण्यास सुरुवात केली.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच महाविद्यालयात महात्मा गांधीच्या जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरिष्ठ प्रा.डाॕ.अर्चना जैन होते तर प्रमुख उपस्थितीत रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॕ.बबन मेश्राम,एन.सी.सी प्रमुख डॉ.एच.पी पारधी, डॉ.किशोर वासनिक, डॉ.प्रविण कुमार, डॉ.कपिल चौव्हाण,प्रा गाडेकर,अनिल मेंढे सह महाविद्यालयतील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
त्यां नंतर रासेयो स्वंयसेवक यांनी महाविद्यालयातून स्वच्छता अभियान जनजागृती रॅली पाल चौक , रेल्वे स्टेशन परिसर, मुख्य बाजारपेठ, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक,शहर पोलीस स्टेशन परिसर मार्ग भ्रमण करीत जनजागृती नारे, पथनाट्य, विविध घोषणा देत अग्रसेन भवन येथे नगरपरिषद व अ.भा.बापू संगठन द्वारा आयोजित कार्यक्रमात समारोप करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम यांनी सांगितले की,स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत रोज प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन केले.
सदर अभियान कार्यक्रमाचे यशस्वीते करीता कार्यक्रम अधिकारी डाॅ.अश्वीनी दलाल, रासेयो स्वयंसेवक निखिल बन्सोड,आलोदिन मोहन्ती,शिवम बहालियां,थामेश हरीणखेडे,डिंपल ढोरे,गुणेश्वरी येडे,शिवानी हाडगे,पुनम वाघाडे,निलम वाघाडे, वैष्णव गौतम,सलोने बल्ले,खुशाल जैन,हरीश भुजाडे,सागर सुर्यवंशी, रोहित राउत ,झामसिंग बघेले,मनिष दहिकर,आरती मौजे, मुस्कान मेश्राम,ममता नाईक,डिक्ली उईके,हर्षु बावनकर,भारती नागपुरे,वैश्णवी नागपुरे,पल्लवी निमजे,राहूल पुसाम,उज्वला शहारे,सह राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक यांनी अथक घेतले.