महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छता ही सेवा” उपक्रम

मुख्याधिकारी,नगराध्यक्षा, नगरसेवक,नगरसेविका ,नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार व सर्व महिला बचतगट सहभागी.
नेर:- नवनाथ दरोई
२ आॅक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १आॅक्टोबर “स्वच्छता हि सेवा” हा उपक्रम देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी राबविण्याचे संपूर्ण देशाला आव्हान केले होते नेर शहरात स्वच्छता हि सेवा अभियानाला आज सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली.
नेर-नबाबपूर नगर परिषद च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता ही सेवा” अभियान राबविण्याचे व त्याच माध्यमातून त्यांना स्वच्छांजली अर्पण करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश प्राप्त झाले होते.त्यानुसार नेर नबाबपूर नगर परिषदेने आज दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी १०.०० वाजता सोमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करून श्रमदानाच्या कार्यक्रमाला नेर नबाबपूर नगर परिषेदेच्या अध्यक्षा सुनीता जयस्वाल ,उपाध्यक्ष पवन जयस्वाल तसेच नगर सेवक सुभाष भोयर,शालिक गुल्हाने, नगर सेविका वैशाली मासाळ,सरिता सुने,रुपाली शिंदे, अर्चना वासनिक व इतर नगर सेवक/सेविका तसेच शहराचे गणमान्य नागरिक व नगरपरिषदे चे मुख्याधिकारी निलेश जाधव, अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगार यांच्या उपस्थितीत सुरुवात केली. यावेळी शहरातील गांधी चौक, सावरकर चौक,बारीपुरा, नेताजी चौक, तसेच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्व: बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पा जवळ कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नेर नबाबपूर शहरातील संपूर्ण महिला बचत गटांनी शहरात श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता मुख्याधिकारी श्री.निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक अरुण वाडेकर, गोपाल पाटील,मज्जपाल कांबळे, विनोद बारबोले व सर्व सफाई कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.