विदेश

वाचा कोणत्या देशावर झाला दहशतवादी हल्ला

Spread the love

तुर्की / नवप्रहार मीडिया 

               तुर्कीची राजधानी अंकारा येथे  दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. मंत्रालयासमोर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात स्फोट होऊन दोन दहशतवाद्यांपैकी  एकाचा मृत्यू झाला तर दुसरा सुरक्षा राक्षकां सोबत झालेल्या कारवाईत मारल्या गेला.

तुर्कीचे मंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, हे दोन दहशतवादी कमर्शियल वाहनाने राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाच्या इमारतीजवळ आले आणि त्यापैकी एकाने स्वत:ला उडवले. तर दुसरा दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. याशिवाय कारवाईदरम्यान दोन पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या स्फोटात किती लोक जखमी झाले आहेत आणि किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची माहिती मिळालेली नाहीये. तसेच या परिसरात गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच ही घटना घडली.

अल जझीराच्या वृत्तानुसार, तुर्कस्तानमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून संसद सुरू होत आहे. संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीजवळ ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close