ब्रेकिंग न्यूज

55 पर्यटकांनी भरलेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू ,35 जखमी.

Spread the love

चेन्नई / नवप्रहार मीडिया

               55 पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने 8 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी असून त्यातील काही गंभीर आहेत. अपघात तामिळनाडू च्या मरापललम इथं शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

आठ जणांचा मृत्यू

एएनआयच्या माहितीनुसार, दरीत बस कोसळून झालेल्या या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर इतर काहीजण गंभीररित्या जमखी झाले आहेत. तर उर्वरित 25 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात कसा झाला? याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, उटीहून ही बस कोईम्बतूर जिल्ह्यातील मेत्तुपलायमकडं निघाली होती. बस घाटातून जात असताना चालकानं बसवरील नियंत्रण गमावल्यानं ही बस थेट 100 फूट खोल दरीत कोसळली.

यावेळी बसमधून 55 पर्यटक प्रवास करत होते. यांपैकी 35 जण जखमी झाले आहेत. या सर्वांना दरीतून वर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. नंतर जखमींना तातडीनं कुन्नूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना 1 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजारांची तातडीची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.मृतांच्या नातेवाईकांना 8 लाखांची नुकसान भरपाई

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close