तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती तहसील कार्यालयावर धडकल्या.
शाळा दत्तक आणि कंत्राटी धोरणनिर्णय बंद कराण्याची मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
आधीच खाजगी शाळा मुळे रोडावलेली सरकारी शाळांचे विद्यार्थी पटसंख्या त्यात शाळा पटसंख्या सरकार एखाद्या उद्योगपतींना किंवा खाजगी संस्थेला जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक देऊन खाजगीकरण करण्याचा आणि कंत्राटी नोकरी भरती करण्याचा शासन निर्णय जारी केला असून त्या निर्णयाविरोधात घाटंजी तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मा. तहसीलदारामार्फत मुख्यामंत्र्यांना निवेदन देण्याकरिता आज 26.9.23 तहसील कार्यालयावर धडक दिली शासनाने शाळा दत्तक देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत चुकीचा असून त्यामुळे संविधानाने जो शिक्षणाचा मूलभूत आणि मोफत अधिकार दिला आहे तो अधिकार शासनाच्या निर्णयामुळे संपुष्टात येईल आणि देशाचा भविष्य घडवीणारी समोरच्या शिक्षण घेत असलेली पिढिंचा भविष्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.1 ते 14 वय वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीच करण्यात आले होत पण, या खाजगीकरणामुळे तो अधिकारही आता हिराहून घेतल्या जाणार असल्याची भीती विध्यार्थी पालक यांच्यात निर्माण झाली आहे.शासनाने त्या घेतलेल्या चूकीच्या निर्णयाचा पुनःर्वीचार करावा. वरील दोन्ही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला मातीत घालणारे आणि आरक्षण संपविणारे आहे. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे आणि शासनाने जारी केलेले शासन निर्णय तात्काळ रद्द करावे यासोबत सर्व क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करून सर्व क्षेत्रातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.बेरोजगारी थोडाफार दूर होण्यासाठी असैक्षणिक कामे गावातील सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडे देण्यात यावे. शासनाच्या सर्व क्षेत्रातील पदभरतीसाठी बेरोजगाराना स्पर्धापरीक्षा करिता राज्यस्थान सरकारप्रमाणे किमान शुल्क आकारण्यात यावे.शिक्षकांची 55000 रिक्त पदे एकाच टप्यात तत्काळ भरण्यात यावी या प्रमुख मागण्यासुद्धा या निवेद समितीच्या वतीने निवेदनाद्वारे शासनदरबारी करण्यात आल्या. यावेळी निवेदन देतांना अरविंद जाधव साखरा,अरविंद चौधरी मुरली,माणिकराव मेश्राम अंजी , डॉ. शविजय कडू देवधरी , अनंतराव चौधरी पंगडी,सुनील हूड,विजय फुलूके साखरा, वैजयंती ठाकरे इंझाळा ,सागर डंभारे राजूरवाडी,सुधाकर अक्कलवार घाटंजी जयवंतराव आडे,मोवाडा,वसीम खान घाटी, विष्णू कोवे मुर्ली,अब्रार कईम चिखलवर्धा,सुनील लोडे साखरा, काशिनाथ मोहाड खडका,अंगद मोरे घाटंजी,अमोल राऊत नागेझरी, पुरुषोत्तम डुकरे नागेझरी,विनोद मडावी राजूरवाडी,लक्ष्मण परचाके कालेश्वर,सुमित राऊत पांढर्णा, नामदेव राठोड,सदाशिव राठोड केळापूर,प्रेमदास ठमके,अरुण राजूरकर दहेगाव,युसूफ खां पाठन सावरगाव,दामोधर लोडे, नितीन सुर्तिकार साखरा,दत्तात्रय पोटपेलीवार घाटी लियाकत तंव्वर घाटंजी आदी तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.