क्राइम
मोटार सायकल चोरीतील आरोपीस अटक
अमरावती / प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांना दुचाकी चोरट्यास अटक करण्यात यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीचा एक साथी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.”
अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन शिरखेड येथे मोटार सायकल चोरीचे अनुषंगाने अप.क्रं. ३०८/२३ कलम ३७९ भा.दं.बी. अन्वये गुन्हा नोंद असून मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा बसण्याचे दृष्टीने गुन्हयाची दखल घेवून मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी व अमलदार यांना त्वरीत सदर गुन्हयात आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्या करिता सुचना निगमीत केल्या आहेत.
तपासा दरम्यान स्था.गु.शा. पोलीस पथकास गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की आरोपी इसम नामे १) रामसिंग गुलाबसिंग धुर्वे, वय २५ वर्षे, रा. शहापुर, वरूड व त्याचा अन्य फरार साथीदार हे मोटार सायकल चोरीच गुन्हयात लिप्त असून अश्या प्रकारचे गुन्हे करित आहेत. वरून स्था. गु.शाचे पथकाने विनाविलंब सापळा रचुन आरोपी रामसिंग गुलाबसिंग धुर्वे, वय २५ वर्षे, रा. शहापुर, वरुड यास चोरीच्या दुचाकीवर जात असतांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी नामे रामसिंग गुलाबसिंग धुर्वे, वय २५ वर्षे, रा. शहापुर, वरूड यांना विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचे फारार स्थाथिदारास शिरखेड हद्दीत मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन आरोपीचे ताब्यातून चोरीचे गुन्हयातील मोटार सायकल ०२ कि.८०,०००/- चे जात करण्यात आल्या आहेत.
पुढील तपासकामी आरोपीस पो.स्टे. शिरखेड यांचे ताव्या देण्यात आले असुन त्याचे फरार साथीदाराचा शोध घेणे सुरू आहे त्याचा साथीदार मिळुन आल्यानंतर आणखी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक, अम.ग्रा. श्री. शशिकांत सातव अपर पोलीस अधिक्षक, अम.ग्रा., यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्वात पो.उप.नि.नितीन चुलपार, पोलीस अमलदार संतोष मुंदाणे, बळवंत दाभणे, भुषण पेठे, रविन्द्र बावणे, पंकज फाटे, संजय देठे यांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1