मातीच्या मूर्तिकारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ; प्रशासनाने शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप
मुर्त्या घेऊन बसले मूर्तिकारलोक
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
शासनाने पर्यावरण पूरक मातीच्या मूर्तींची विकल्या जाव्यात त्याकरिता प्रशासनाला पर्यवरणाला धोकादायक ठरत असलेक्या पीओपी मूर्तीच्या विक्रीवर बंदी आणावी असा आदेश दिला असतांना सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात खुलेआम पीओपी मुर्त्या विकल्या गेल्या आणि त्याचा फटका मातीच्या मूर्ती निर्मित करणाऱ्या मूर्तिकारांना बसला आहे. त्यामुळे मातीच्या मूर्तिकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकुटुंब जाऊन निदर्शन केले.
आज दिनांक 21 9 2023 ला यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर सर्व मातीच्य न खपलेल्या मुर्त्या घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याकरिता छोटे छोटे मुलं बाळ घेऊन जमा झाले होते याआधी दिनांक 14 8 2023 ला मातीच्या मूर्तिकार संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते व त्यामध्ये पीओपी पासून बनविलेल्या मूर्तींचा बाजारात कोणत्याही प्रकारची विक्री होऊ देऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून शहरातील दत्त चौक परिसर आर्मी रोड परिसर व समता मैदान येथे सर्रासपणे पीओपी च्या मुर्त्या विक्रीस उपलब्ध होत्या वास्तविक पाहता उच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा प्रशासन याकडे कशाप्रकारे दुर्लक्ष करतात माती पासून बनवलेल्या मुर्त्यांना भाव मिळत नसल्याने माती पासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांचे मात्र हाल होत आहे,
प्रदूषण टाळण्यात प्रशासन असमर्थ का प्रशासनाकडूनच होते देवाची विटंबना एकीकडे पंतप्रधान म्हणतात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये पीओपी पासून बनविलेल्या मुर्त्यां ना स्थान नाही पण यवतमाळ मध्ये मात्र सर्रास विक्री झाली प्रशासनाने ह्या प्रकरणाकडे गंभीर्याने लक्ष देऊन आम्हा मूर्ती कारांवर होणारा अन्याय त्वरित थांबवावा व आमचे झालेले नुकसान नुकसान भरपाई स्वरूपात द्यावे अशी मागणी मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी सौ राधिका खेडेकर सौ अरुणाताई कुंभार श्री सुभाष सूर्यवंशी गोविंद नरवाडे यांनी निवेदनातून केली