वयोवृद्ध इसमा कडून आठ वर्षीय मुलीचा विनयभंग.
घाटंजी ता.प्रतिनीधी-सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील भंडारी शिवर येथिल एकनाथ झरेकर वय ५५ हा एका ओळखीच्या घरात टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात बसला त्या रूममध्ये आठ वर्षीय आजारी बालिका आराम करीत असतांना त्या मुलीसोबत एकनाथ ने अश्लील चाळे सुरू केले.मुलगी घाबरून ओरडत घराबाहेर आली घरचे मंडळींना आपबिती सांगितली हा प्रसंग लक्षात येताच म्हातार्याला गावकऱ्यांनी समज देऊन घाटंजी पोलीसाच्या हवाली केले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नूसार चिमुकली आजारी असल्याने घरात एकटीच टीव्ही बघत होती याच संधीचा फायदा घेत हा नराधम टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात शिरला व बालिके सोबत अश्लील कृत्य करू लागला. मुलीला ही बाब लक्षात येताच तीने आरडा ओरड करीत घराबाहेर पळ काढला त्यामुळे घरातील सदस्यांना ही घटना माहीत पडली. शेजारीच उभ्या असलेल्या घरातील लोकांनी त्या वासनांध व्यक्तीसबदल घाटंजी पोलिसांना माहिती दिली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी पोहोचून सदर व्यग्तिला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे कळते.
पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश सुरडकर साहेब यांचे मार्गदर्शनात सुरू असून आरोपीस पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेचं कळते.