क्राइम

बनावट देशी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस सह आरोपी एलसीबी च्या ताब्यात

Spread the love

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

विनापरवाना अवैध्यरित्या अग्निशस्र बाळगून फिरत असलेल्या आरोपीस शस्त्रासह जेरबंद करण्यात आले. सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने रविवारी घाटंजीत केली.प्रतिक ऊर्फ बंटी दत्तात्रय गंदारे वय २४ वर्ष रा.घाटंजी ह.मु.पारवा हे आरोपी नावे असून एलसीबीचे पथकास मिळालेल्या गुप्त माहिती आधारावर घाटंजी अमरनाथ मंदीर परिसर येथे सदर व्यक्ती देशी पिस्तूल घेऊन संशयास्पद फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली त्या आधारावर पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळ गाठले असता एक व्यग्ती संशयास्पद फिरत असतांना आढळून आली.गुन्हे शाखा पथकातील अधिकारी यांनी सदर व्यग्तीची अंगतपासणी केली असता त्यांच्या कमरेला पॅन्टच्या उजव्या बाजूला एक देशी पिस्तूल काळ्या रंगाची व दोन जिवंत काडतुस आढळून आले. सदर व्यग्तिला ताब्यात घेऊन पथकाने ५२ हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त केला.आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड,अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे आधारसिंग सोनोने, संतोष मनोहर,विनोद राठोड व टेकाम साहेब यांनी पार पाडली.बनावट पिस्तूल कुठून व कशी आली याबाबत पुढील तपास सुरु असल्याचं कळते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close