आमदार डॉ..संदीप धुर्वे साहेब यांच्या विकासनिधीतून घाटंजीत कुणबी समाज भवन भूमिपूजन सोहळा संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी येथे कुणबी समाज भवन भूमिपूजन सोहळा साई मन्दिर परिसर खापरी येथे संपन्न झाला.या सोहळ्याला आमदार डॉ. संदीप धुर्वे,नितिन कोठारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी,सचिन पारवेकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी,शंकरराव काकडे माजी सरपंच खापरी व देवकुमार शेंडे उपसरपंच खापरी तसेच सर्व शाखेय कुणबी समाज बांधव यांच्या उपस्थितीत ह्या सोहळाचे भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्या नंतर आमदारांचा समाजा तर्फे सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाजातील जेष्ठ नागरीक गौतमराव चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचकावर ज्येष्ठ समाजबांधव प्रकाश पाटील डभारे,सतीश भोयर,डॉ अरविंन्द तूरक,सुनील देठे,भास्करराव मोघे मोहन प्रधान,ज्ञानेश्वर वघरे साहेब, अशोक चटुले,वासुदेवराव महल्ले, भरत पोतराजे,राजू गावंडे ,बंडू कदम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धांडे साहेब मंचावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ. धूर्वे यांनी आपण जनतेचा प्रतिनिधी असून जनतेच्या समस्यां सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले तसेच आपण आमदार म्हणून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कदापिही तडा जाऊ देणार नाही असे विचार ही आमदार धूर्वे यांनी मांडले.सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सुरेश डहाके सर यांनी केले.मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी शैलेश इंगोले माजी सभापती प.स घाटंजी यांनी समाज म्हणून आपण आमदार महोदयांच्या विकास कामांच्या सदैव पाठीशी उभे राहू व आमदार महोदयांच्या हातून विधानसभा मतदारसंघाचा विकास होवो असे मतही व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गवळी सर,आभार प्रदर्शन गिरीष बोरकर सर यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.या कार्यक्रमाला कृ.उ.बा घाटंजीचे संचालक नंदकिशोर डंभारे,पत्रकार अरविंद चौधरी,प्रशांत उगले,अनिल गावंडे,भरत पोतराजे,अनिल डहाके,अंकुश ठाकरे,संतोष राउत,स्वप्निल भोंग,अमोल ढगले सह इतरही कुणबी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.