घाटंजीत दोन ठिकाणी गोमांस जप्त ; ४२ हजाराचा मुद्देमाल ताब्यात
◆ घाटंजी पोलीसांची कारवाई ; आरोपी विरूद्ध गुन्हे दाखल
■ तिन जिवंत गाई सह गोमांसकेले जप्त
● गोवंश कत्तल कायमस्वरूपी बंद करण्याचे पोलिसांपुढे आवाहन
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी शहरात गोवंशाची कत्तल करून मांसविक्री करत असलेल्या कत्तलखान्यावर पोलीसांनी मागील दोन महिन्यांत दुसऱ्यांदा छापा टाकून आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केल्याची घटना पोळ्याच्या करीच्या म्हणजे बडग्याच्या दिवशी सकाळीच उघडकीस आली आहे तेव्हा गोवंशाची कत्तल कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी जनतेतून मागणी होत आहे.
घाटंजी शहरातील गौकत्तल सत्र थांबता थांबेना.ऐन बड्ग्याचे दिवसी पुन्हा घाटंजी पोलीस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती नूसार घाटंजी येथिल संत मारोती महाराज वार्ड येथे गोमासाची विक्री चालू असल्याची गोपनीय माहिती माहीतीगार पासून मिळाली त्या आधारावर गोमास विक्री चालू असतानाच दि.15 सप्टेंबर ला सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेख युनुस शेख चांद,शेख रिजवान शेख इरफान,यांचेकडे ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय खाडे,पी एस आय नागरगोजे,जमादार शेख कलीम,जमादार सपना पंधरे यांनी धाड टाकून आरोपी शेख युनुस शेख चांद,शेख रिजवान शेख इरफान,यांचे कडून 70 किलो गोमांस एक चाकू ,कुराड किमंंत दहा हजार पाचशे रू असे पोलीसांनी धाडीत जप्त केले. तसेच इंदिरा आवास घाटी मदिना मस्जिद जवळ तिन जिवंत गाई किंमत अंदाजे 25 हजार रूपये ,25 किलो कापलेले गोमांस किंमत सहा हजार रु सहीत आरोपी शेख तन्वीर शेख ,शेख जमीर शेख करीम,विशाल सुभाष तेलंगे सगळे आरोपी रा.घाटंजी येथिल असून यांना अटक करण्यात आले. पकडलेले गोमांस संपूर्ण जिवंत गाई आणी गोमास एकून किमंत एक्केचाळीस हजाराचे आसपास गोमांस आणी जिवंत गाईसह घाटंजी पोलीस स्टेशन आनण्यात आले.सदर गोमांस विक्री आरोपीस ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय खाडे, जमादार विनोद मेश्राम,अशोक कोवे,विवेक घोसे,महादेव डाखारे, यांनी गोमांस विक्री करणाऱ्या वर धाड मारून आरोपीसह गोमांस जप्त केले.गोऊ कत्तल व गोमांस विक्री आरोपीवर कलम 5 अ ब क 9 महाराष्ट्र प्राणी स्वरक्षण अधिनियम कायदा सह कलम 429 ,34 अंतर्गत भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे तसेच पुढील तपास घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर साहेब यांचे मार्गदर्शनात पि एस आय नागरगोजे व सहकारी करीत आहे.
000000000000