राजकिय

अजित दादा गटाच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया 

                 मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या अनेक घडामोडीमुळे राजकीय वातावरण आधीच तापले आहे. अश्यातच अजित पवार गटाच्या प्रवक्त्याने केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमच्या संपर्कात आहेत असा दावा केला आहे. वाटल्यास पुरावे देखील देऊ शकतो असेही म्हटले आहे.

  राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यांचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगा समोर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत ऑक्टोबर महिन्यात सुनावणी होणार आहे. यातच अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि युवा नेते सुरज चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात मोठे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

31 आमदार आणि 9 मंत्री यांना शरद पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली आहे. ज्यांना नोटीस बजावली त्यातील काही आमदार आमच्या संपर्कात आहे. नोटीस बजावलेल्या आमदरांना परत पक्षात घेण्याबाबत पुनर्विचार केला जाणार नसल्याचा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर सुरज चव्हाण म्हणाले, जे अशा प्रकारे बोलत आहे, तेच आमच्या वरिष्ठांच्या थेट संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदारांचे हवं तर आपण आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेले देवगिरी आणि मंत्रालयातील कार्यालय परिसरातील फुटेज तपासू शकतात, असा दावा चव्हाण यांनी केला.

राष्ट्रवादी पक्षाचा वाद निवडणूक आयोगात- शिवसेना पक्षाप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाददेखील निवडणूक आयोगात पोहोचला. दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने येणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह यावर दोन्ही गटाने दावे केले आहेत. दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडायची आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

राज्यातील राजकारण तापणार- पक्षात कोणते फूट नसून शरद पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेतबाबत सहा ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार हे निश्चित आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close