शैक्षणिक

स्कूल ऑफ स्कॉलर्स मनवा ठरली सुवर्णकन्या!

Spread the love

सतीश भालेराव नागपूर :- मॉर्डन पँथेथलॉन फेडरेशन ऑफ इंडिया. द्वारा आयोजित 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2023 रोजी “राष्ट्रीय मॉडर्न स्पर्धा” पुणे येथील क्रीडापीठ बालेवाडी क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. यामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स इयत्ता सातवी ‘अ’ ची विद्यार्थिनी (मनवा मयूर पाबळे) हिने अनुक्रमे बायथलौन (धावणे पोहणे धावणे) व ट्रायथलोन शूटिंग (पोहणे आणि धावणे) या ऑलम्पिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करत पुन्हा एकदा अमरावतीची सुवर्णकन्या म्हणून आपले नाव लौकिक केले. तसेच तेरा वर्षे वयोगटातील उत्कृष्ट खेळाडू हा बहुमान देखील दिला प्राप्त झाला. आगामी बाली इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धे करिता तिची भारतातर्फे निवड देखील याप्रसंगी करण्यात आली. स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य सुरेश लकडे यांच्या मार्गदर्शनात तथा उपप्राचार्य समीधा नाहार, सारिका वर्मा, प्रशासकीय अधिकारी अभिषेक गटलेवार, क्रीडाविभाग प्रमुख निरज डाफ, क्रीडाशिक्षक शिक्षक दिलीप तिडके, गायत्री खरे, गणेश विश्वकर्मा, संकेत गावंडे, प्रतीक्षा ठाकरे ,अस्मिता डोळस, कस्तुभ धाकडे सर्वेश मोहोळ, आदींनी मनवाला पुढील भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या, व मनभरुन कौतुक केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close