काँग्रेस तर्फे जनसंवाद यात्रेचे आयोजन
यवतमाळ, ( वार्ता )
यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार जिल्हा परिषद सर्कल मध्ये दिनांक 8 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात संवाद रॅली निघाली.
या संवाद यात्रेतून ग्रामीण भागातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने महिलांवरील वाढता अत्याचार, भ्रष्टाचार, महागाई इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली असून अकोला बाजार सर्कल मधील चापडोह बोध गव्हाण धानोरा सावरगड मुरझडी बेलोरा रुई बाई मांगुळ बोरीसिंह इत्यादी गावातील जनतेशी संवाद साधला ग्रामीण भागातील जनतेने संवाद यात्रेच्या वेळी माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्याशी वार्तालाप करताना जनतेने आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री रवींद्र ढोक रमेश भाऊ भीषणकर ब्राह्मानंद काळे गोविंद वंजारी वासुदेव गुघाने सुहास सरगम उमेश चोरमले संजय घोडे दिलीप कुकरे संतोष वानखडे डॉक्टर कृष्णा कावळे शेख जब्बार भाई भालचंद्र कलाने विजय डाखोरे नरेंद्र जगताप सिताराम आडे काशीराम राठोड इत्यादींचा सहभाग होता