शैक्षणिक

पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांचा गौरव.

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

नुक्तेच महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ शाखा घाटंजीच्या वतीने पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांच्यावतीने आदर्श मुख्याध्यापिका म्हणून नगरपरिषद शाळा क्रमांक 5 च्या मुख्याध्यापिका सिंधुताई सिडाम ,अग्निपंख या संस्थेमार्फत आदर्श शिक्षिका म्हणून वृषाली अवचित यांना पुरस्कार जाहीर झाले आहे तसेच मतदारांचे h2h सर्वेचे काम वेळेपूर्वी पूर्ण करणाऱ्या व तहसील कार्यालयाने आदर्श मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त तुषार बोबडे यांचा महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ शाखा घाटंजी च्या वतीने जागतिक साक्षरता दिनाचे औचित्याने शाल श्रीफळ देऊन सत्कार घेण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण पडलवार अध्यक्ष स्थानी होते तर घाटंजी नगर परिषद प्र.प्रशासन अधिकारी रुपेश कावलकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच नगरपरिषद शाळा क्रमांक पाचच्या मुख्याध्यापिका सिंधुताई सिडाम ,मुख्याध्यापक अतहर सर,नाझीर सर,आशिष साखरकर सर जिल्हा संपर्क प्रमुख शंकर मायकलवार,जिल्हा सहसल्लागर स्वाती भौंग हेही उपस्थित होते.झालेल्या सत्कार प्रसंगी मत व्यक्त करताना स्थानिक पातळीवर झालेल्या सत्काराला विशेष महत्त्व असल्याचे आणि हा सत्कार आपल्या लोकांतून होत असल्यामूळे आनंद होत असल्याचे मनोगत सत्कार मुर्ती यांनी व्यक्त केले.कार्यक्रम अध्यक्ष अरुण पडलवार यांनी संघटित राहून संघर्ष करण्याची व नगर पालिकेच्या शाळा अधिकाधिक प्रगतीशील कही करता येईल यासाठी सर्व शिक्षकांचे प्रयत्न चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष साखरकर सूत्र संचालन संघट सचिव अनिकेत निंबाळकर तर उपस्थितांचे आभार विपुल भोयर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरिता पडोळे,सोनिया पांडे,भारत भाऊ नगराळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close