स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये भारतीय जीवन आयुर्विमा आयोजित चित्रकला स्पर्धा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
भारतीय जीवन आयुर्विमा कार्यालय, धामणगाव रेल्वे तर्फे श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एलआयसीला ६६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता 7 वी ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दहीहंडी या विषयावर अतिशय सुंदर व आकर्षक चित्रे काढली. या चित्रकला स्पर्धेत आकर्षक व सुंदर चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय जीवन आयुर्विमा कार्यालय, धामणगाव रेल्वे यांच्याकडून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भारतीय जीवन आयुर्विमा कार्यालय, शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, कला शिक्षक अतुल मांडवकर, इंग्रजी शिक्षक नितीन श्रीवास, ग्रंथपाल प्रवीण टोंगे व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व भारतीय आयुर्विमा धामणगाव रेल्वे यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.