शिक्षकावरील अशैक्षणिक कामे काढून शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्या…..
प्रतिनिधि हितेश गोरिया
धामणगाव रेल्वे तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा धामणगाव रेल्वे यांच्यावतीने श्री योगीराज मोहोड अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सामूहिक रजा आंदोलन अंतर्गत शिक्षकावरील अशैक्षणिक कामे काढून विद्यार्थीनां शिक्षकांना शिकू द्या या संदर्भात निवेदन मा. निवासी तहसीलदार व गटविकास अधिकारी धामणगाव रेल्वे यांना देण्यात आले प्राप्त माहितीनुसार स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाच्या कामापासून दूर ठेवण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष व अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या अशा घोषणा देत प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपली संतप्त भावना व्यक्त केलेली आहे. शिक्षकावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन निर्माण करून अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री यांच्यापर्यंत तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पोहोचण्याचे काम केलेले आहे निवेदन देण्यासाठी विवेक ठाकरे (सरचिटणीस )विक्रांत टेकाडे (कार्याध्यक्ष )शरद थोटे (सहकार्याध्यक्ष) केशव पोटे (उपाध्यक्ष )धीरज देशमुख (संघटक) नितीन परचाके ( संघटक ) श्रीमती रूपाली देशमुख( म. अध्यक्ष )श्रीमती सविता सुपटकर (म.सरचिटणीस) प्रसिद्ध प्रमुख चंद्रशेखर भटकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धामणगाव रेल्वे यांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते