ब्रेकिंग न्यूज

पाण्यात बूडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले

Spread the love

पोहण्याचा मोह जिवावर बेतला.
वणी । प्रतिनिधी
वणी तालूक्यातील वांजरी गावालगत असलेल्या ठिकाणी पूर्वी चूनखडकाची खाण होती,मात्र यातील खनिज संपल्याने ही खाण बंद झाली अाहे,त्यामूळे त्याजागेवर विस्तीर्ण असा खड्डा तयार झाला असून पावसाचे पाणी साचून येथू छोटा तलाव बनला अाहे,त्याच साचलेल्या पाण्यात बूडालेल्या तीनही तरूणांचे मृतदेह शोध पथकाला सापडले अाहे,अासीम अब्दूल सलाट(16),नूमान शेख सादिर शेख(16) दोघेही रा,एकतानगर व प्रतिक संजय मडावी(16) रा,प्रगतीनगर हे सर्व वणी शहरातील रहिवासी असलेले हे तीनही अल्पवयीन मूलं शनिवारी लाईमस्टोन खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्याकराता गेले असता त्यांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला,दि,2 सप्टेंबरला दूपारीच्या सूमारास घडलेली ही दूदैवी घटना सायंकाळच्या सूमारास उघडकिस अाली,
“मोबाईलच्या रिंगने प्रकरण उघडकिस”
या मूलांजवळ असलेला मोबाईल सूरू होता,संध्याकाळ होत अाली तरी मूलं घरी परतले नाही म्हणून मूलांचे पालक मूलाच्या मोबाईलवर सातत्याने काॅल करीत होते,मात्र मोबाईलवर केवळ रिंगच जात होती,वांजरी येथील स्वप्निल रहाटे नामक शेतकर्‍यांची शेती वांजरी शेतशिवारात शेती अाहे,ते शनिवार रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सूमारास शेतातून बैल घेऊन घरी परत जात होते,त्या दरम्यान त्यांना या खड्ड्याजवळ मोपेड गाडी उभी दिसलेली अाढळली,त्यामूळे ते त्या तळ्याजवळ गेले असता तिथे मोपेडच्या डिक्कीतून मोबाईलची रिंग वाजत असल्याचे अाढळले,बाजूला चप्पल व कपडे बाजूला असल्याने त्या शेतकर्‍याला संशय अाला,मात्र डिक्की लाॅक असल्याने ते तातडीने वांजरी येथे जाऊन गावातील काही लोकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले,दरम्यान मूलांचे पालक सातत्याने काॅल करित असल्याने मूलांच्या मोबाईलची रिंग वाजत होती,एका इसमाने त्या मूलाचे कपडे चेक केले असता त्यांना त्यात दूचाकीची चाबी अाढळली,त्या चाबीने त्यांनी डिक्की उघडली व मोबाईल रिसिंव्ह केला,गावकर्‍यांनी पालकांना घटनास्थळ सांगून मूले घटनास्थळी नसल्याची माहिती दिण्यात अाली,मूलांच्या पालकांनी तातडीने वणी पोलीसांना संपर्क साधत मूले बेपत्ता असल्याची माहिती दिली व ते घटनास्थळी दाखल झाले,त्या माहितीनूसार ठाणेदार जाधव यांनी तातडीने संध्याकाळी शोध मोहिमेला सूरूवात केली,मात्र रात्री उशीर झाल्याने रात्रीचे 8 वाजताच्या सूमारास शोधकार्य मोहिम थांबवण्यात अाली,दरम्यान या ठिकाणी पोलीसांचे पथक व मदत कार्य पथक तळ ठोकून होते,रात्री उशीरा एकाचा मृतदेह वर अाला तर पहाटे दोघांचे मृतदेह मिळाले,
अल्पवयीन मूलांचा पाण्यात बूडून दूदैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती,या तिघाचेही मूतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात अाणण्यात अाले,या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात सूरू अाहे,

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close