सामाजिक

मुस्लिम कब्रस्तान भावनांच्या बांधकामाचे पालकमंत्र्या हस्ते भूमिपूजन,

Spread the love

सौंदर्यीकरणाच्या व भावनाच्या बांधकामाचा दर्जा राखला जावा, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना,
नेर:-नवनाथ दरोई
मुस्लिम कब्रस्तानात
श्रद्धांजली भवनासाठी राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री, संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून या मंजूरीतून टिनाचे श्रद्धांजली भवन,आणि सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमिपूजन संजय राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत 99 लाख 72 हजार दोनशे रुपयांच्या कामात श्रध्दांजली भवन तयार करून कब्रस्तानाच्या परिसरात सौंदर्यीकरण करण्याचे काम देखील केले जाणार आहे. श्रद्धांजली भवनाच्या बांधकाम व सौंदर्यीकरण्याच्या कामाचा दर्जा राखावा अशा सूचना देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केल्या.भवनाची उभारणी व सौंदर्यीकरणाची कामे नेर नगर परिषद अंतर्गत केल्या जाईल. मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानात श्रद्धांजली भवन उभारण्याची मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात आली होती. मुस्लिम बाधंवाच्या मागणीची दखल घेत संजय राठोड यांनी विशेष प्रयत्नातून एक कोटी रुपयाचा निधी या भावनासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे मुस्लिम बांधवांनी कब्रस्थानात राठोड यांचे स्वागत केले.यापुढे मुस्लिम बाधंवाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कुठल्याही ऋतूत त्रास होणार नसल्याने समाजात आनंदाचे वातावरण दिसून आले. भूमिपूजन समारंभाला नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, मुख्याधिकारी निलेश जाधव, नगरसेवक सुभाष भोयर, तनवीर खान, वैशाली मासाळ, शहबाज अहमद,वाजिद खान, एड. सलीम शहा, मौलवी रिजवान उल्ला खान व अन्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close