सामाजिक
मेळघाट च्या विद्यार्थ्याचा मृतदेह गादी च्या थप्पीखाली सापडल्याने खळबळ
वर्धा / नवप्रहार मीडिया
वर्धा जिल्हयातील कारंजा तालुक्यातील नारा गावात असलेल्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. गादया खाली दबल्याने विद्यार्थांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार धारणी तालुलक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिवम सनोज उईके 12 हा वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा गावात यादवराव केचे निवासी आश्रम शाळा येथे शिक्षण घेत होता. पण बुधवारी रात्री 8. 30 च्या सुमारास जेव्हा इतर विद्यार्थी नित्यनियमा प्रमाणे झोपायला आले. आणि त्यांनी गादया उचलल्या तेव्हा त्यांना शिवम गादयाच्या ढिगाऱ्याखाली दबलेला दिसला.या घटनेची माहिती त्यांनी लगेच शिक्षकांना दिली. शिक्षकांनी मनोज ला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
शाळा प्रबंधनाचा निष्काळजी पणा आला समोर – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिवम याने सुरवातीचे 2-3 पिरेड केले आणि त्यानंतर तो वर्गात दिसला नाही.विद्यार्थी वर्गात आढळून न आल्याने संबंधित शिक्षकांनी त्याबद्दल इतर विद्यार्थ्यांनाकडे विचारपूस करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नाही.
नागपूर च्या मेडिकल कॉलेज मध्ये झाले इन कॅमेरा शव विच्छेदन – मनोज च्या मृतदेहाचे शव विच्छेदन नागपूर च्या शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा झाले आहे. बातमी लिहेस्तोवर ताबद्दल काही कळू शकते नव्हते.
याबद्दल मनोज वानखडे यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलणे झाले असता ते म्हणाले की मनोज ने सकाळी काही पिरेड केले. काल रक्षाबंधन असल्याने शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.सगळे त्याच गडबडीत होते. त्यामुळे मनोज सोबत जो दुर्दैवी प्रसंग घडला त्याबद्दल कळले नाही.नेहमी प्रमाणे इतर विद्यार्थी जेव्हा रात्री झोपायला गेले आणि त्यांनी गाद्या उचलल्या त्यावेळी घटना उघडकीस आली . मनोज च्या मित्रांकडून असे कळले की त्याला आज बरे वाटत नव्हते. त्यामुळे तो गादया ठेवलेल्या खोलीत आला . दरम्यान त्याला चक्कर वगैरे आल्याने तो खाली कोसळला असावा.आणि कोसळताना त्याच्या हातात गादया आल्या असाव्या.आणि त्या गाया त्याच्या अंगावर पडल्या असाव्या.अश्यातच त्याची शुद्ध हरपल्याने गादी खाली दबल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा.