लहान शाळकरी विद्यार्थी न प वर धडकले
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
नगरपरिषद अंतर्गत असलेल्या उर्दू शाळेत शिक्षक नसल्याने विद्याथ्र्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करीत शिक्षकाच्या मागणीकरीता मंगळवारी विद्यार्थी नगरपरिषदेवर धडकले होते. यावेळी विद्यार्थ्यासह पालकांनी ठिय्या दिला.
नगरपरिषदेच्या या उर्दू स्कूलमध्ये जवळपास ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सध्या येथे एका शिक्षकांवरच इतर वर्ग चालतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक मिळण्याकरीता कित्येकदा तक्रारी देवुन सुध्दा याची दखल न घेतल्याने मंगळवारी विद्यार्थी व पालक नगरपरिषदेवर धडकले होते. यावेळी नगरपरिषदेत शिक्षकांसाठी ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविला. ५ सप्टेंबरपर्यंतत्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन सादर करण्यात
आले. शिष्टमंडळात शाळा व्यवस्थापनसमितीचे अध्यक्ष सय्यद मुश्ताक,मो. वसीमोद्दीन अंसारी, अहमद खान,अब्दुल रफीक, मतीन खान, जावेदखान, अजीज खान, शेख मुतुंजा, मोहम्मद एजाज, सय्यद अबीद अली, मोहम्मद सलीम, अशफाक खान, मो. सलीम कुरैशी, मोहम्मद आबिद, हाफिज मो. जाकिर हुसैन, नुरानी मस्जिद, गुलाम मुस्तुफा मो. वसीउद्दीन, जुबेर खान, मो. सलीम दत्तापुर, शेख समीर, सय्यद शहादत अली, अय्यूब खान, निंदा शहर वसीमुद्दीन, लायबा अंजुम अब्दुल अनीस, सानिया शेख युसुफ, सालेहा मो. रफीक, महक अंजुम शब्बीर खान, यासिरअम्मार मोहम्मद शाकिर, मुबशीर खानअंसार खान, मो. अबान नाजिम कुरैशी,मो. आमिर मो. वसीम, उपस्थित होतेशाळेला तीन शिक्षक देण्यात येईल,असे आश्वासन नगरपरिषदेचे प्रशासकअधिकारी उमेश गोंडीक यांनी दिले