हटके

अमानविय कृत्य करणाऱ्या नराधमावर गुन्हे दाखल करून  अटक करावी.

Spread the love
श्रीरामपूर / नवप्रहार मीडिया
                     दलित युवकावर झालेल्या मारहाणीचा निषेध करत असे घृणीत कृत्य करणाऱ्या नराधमाला अटक करून त्याला शिक्षा द्यावी असे निवेदन  साहित्यरत्न कला व सांस्कृतिक विकास फाऊंडेशन व लहू टायगर सेना कडून
जिल्हाधिकारी  यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
 महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना दिनांक 26/08/2023 श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे उघडकीस आली असुन पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही दलीतांवरती सुवर्ण जातीकडून अत्याचार केला जात आहे. महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून दलितांना विषेश लक्ष करून त्यांच्यावरती अत्याचार केल्या जात आहे.
राजकीय पाठबळांचा वापर करून येथील सुवर्णा जातीतील लोकांनकडून दलितांवरील अत्यचाराचा आलेख दिवसें दिवस वाढत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गावगुंड मुख्य आरोपी नाना गलांडे व
सहकारी यानी दलित तरुणाला कबुतरे चोरल्याच्या संशयावरून अर्धनग्न करून, झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर थुंकणे, लघवी करणे असे अमानवी प्रकारे करण्यात आले.
सदर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. वर्णवादी जातीय विचारसरणीचे सरकार महाराष्ट्रात व देशात सत्तेवर आले असल्याने दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. गावपातळीवरचे सत्ताधाऱ्यांचे हस्तक नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे हस्तक राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहाय्यक यांच्या नातेसंबंधातील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा घेऊन गावात जातीची दहशत निर्माण करून दलितांवर अत्याचार करीत आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी आज रोजी फरार असून त्याचा तातडीने त्याचा शोध घेण्यात यावा व त्याला अट करून त्याच्यावर अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच त्याच्या मागे असणाऱ्या राजकीय सुत्रधारांचा ही शोध घ्यावा,
अशी मागणी निवेदनात मार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करीत आहोत. आपणा कडून श्रीरामपूर पोलिसांना मुख्य आरोपींना पकडण्याचे तात्काळ आदेश देण्यात यावे. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पिढीत परिवारास संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी. करीता निवेदन सादर करण्यात येत आहे. दलितांवरील होणाऱ्या अन्यायाला आपल्या मार्फत न्याय मिळावा. यावेळेस निवेदन देण्याकरिता निवेदन देण्याकरिता नवनीत महाजन, देविदास महाले, सागर करणे, संजय नाटकर, अरविंद वानखडे, सुरज लोंढे, विशाल तेलंगे, महेश गवई, विनायक वानखडे, निहाल कळणे, गणेश भांडवले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close